Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवांगी जोशीने गुपचूप उरकला साखरपुडा? बोटातील अंगठीचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 11:36 IST

शिवांगी घरोघरी "नायरा" या नावाने ओळखली जाते.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे. या मालिकेतून शिवांगी घरोघरी "नायरा" या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर ती आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करतात. यातच अता शिवांगीच्या एका पोस्टनं सर्वांच लक्ष वेधलं असून चाहत्यांना धक्का बसला आहे. 

 शिवांगी जोशीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेलं कॅप्शन आणि तिच्या बोटातील नवीकोरी हिऱ्याची अंगठी पाहून तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  शिवांगीने शेअर केलेल्या फोटोंना 'मी हो म्हणाले' असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. 

शिवांगी अशी पोस्ट केली असली तरी तिचा साखरपुडा झालेला नाही. शिवांगीच्या बोटातील ही अंगठी साखरपुड्याची नाही. तर एका दागिन्याच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली आहे. शिवांगीनं हे फोटो संबंधित दागिन्यांच्या कंपनीला टॅग केले आहेत. शिवांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहलं, 'एका सेकंदासाठी मला वाटलं की तुझा साखरपुडा झाला आहे'. तर आणखी एका युजरने लिहलं, 'मला तर मिनी हार्ट अटॅक आला'. तर एकाने लिहलं, 'आमचं तर मोये मोये झालं. पहिल्यांदा असं वाटलं की खरचं तुझा साखरपुडा झाला'.

शिवांगी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांची जोडी पडद्यावर चांगलीच पसंतीस उतरली आहे. दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही आल्या. परंतु,दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

 शिवांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ते 'ये प्यार तुने क्या किया', 'लव्ह बाय चान्स', 'ये है आशिकी', 'ये रिश्ते है प्यार के', 'खेलती है जिंदगी आँख मिचोली', 'बेगुसराय' यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने 'बेकाबू' या फँटसीवर आधारित असलेल्या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. तर नुकतेच ती 'बरसाते' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैटिव्ही कलाकारसेलिब्रिटीसोशल मीडियाइन्स्टाग्राम