Join us
Daily Top 2Weekly Top 5

"होळीवरती माळ चढवली हिरव्या गुलाबी गोंड्यांची...", वनिता खरातचा नवऱ्यासाठी खास उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 11:34 IST

Holi 2024 : होळीसाठी वनिता खरातने घेतला खास उखाणा, पतीने शेअर केला व्हिडिओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. उत्तम अभिनय आणि अफलातून विनोदाची सांगड घालत वनिता प्रेक्षकांना पोट धरुन हसवते. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. करिअरमधील अपडेट्सबरोबरच वनिता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीही शेअर करताना दिसते. आता वनिताचा होळीनिमित्तचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

देशात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटीही होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. वनितानेही पती सुमित लोंढेसह पारंपरिक पद्धतीने होळी साजरा केली. यावेळी तिने पतीसाठी खास उखाणाही घेतला. याचा व्हिडिओ सुमितने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. "होळीवरती माळ चढवली होती हिरव्या गुलाबी गोंड्यांची, सुमितरावांचं नाव घेते झाली मी सून लोंढ्यांची", असा उखाणा वनिताने घेतला. होळीसाठी वनिताने खास निळ्या रंगांची साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. 

वनिताने हास्यजत्रेबरोबरच अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' सिनेमातील पुष्पा या पात्रामुळे वनिता प्रसिद्धीझोतात आली होती. वनिताने २ फेब्रुवारी २०२३ रोजी सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्राहोळी 2024टिव्ही कलाकार