Join us
Daily Top 2Weekly Top 5

गश्मीर महाजनीची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री ? स्वत: खुलासा करत म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:14 IST

'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) पाचवा सिझन येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) पाचवा सिझन येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यातच अनेक कलाकारांची नावं या यादीमध्ये समोर येतायत. यामध्ये आता अभिनेता गश्मीर महाजनीचंही (Gashmeer Mahajani) नाव चर्चेत आलं आहे.  यावर अखेर खुद्द गश्मीरनेच उत्तर दिलं आहे.

गश्मीर अनेकदा इन्स्टाग्रामवरुन askgashmeer हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. नुकतंच त्याने हे सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली. एका चाहत्याने गश्मीरला "बिग बॉस करणार का लाईफमध्ये कधी" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने अगदीच चोख उत्तर दिलं आहे. "तुम्हाला मराठी सिनेमा चांगला चालावा असं वाटतंय का?". तर याआधीही गश्मीरने 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक म्हणून नाही तर शोचा होस्ट म्हणून जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. 

यासोबत गश्मीरला एका चाहत्याने येत्या काळात तुझे मराठी चित्रपट किंवा नाटक येणार आहेत का असा प्रश्न केला. यावर गश्मीरनं उत्तर देत सांगितलं की, त्याचे 'मराठीत फुलवंती आणि हिंदीमध्ये छोरी २ हे सिनेमे येणार आहेत'.  दरम्यान, गश्मीर लवकरच 'खतरों के खिलाडी' या रोहित शेट्टीच्या रिएलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच तो वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असतो. 

टॅग्स :गश्मिर महाजनीबिग बॉसबिग बॉस मराठीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसोशल मीडियाइन्स्टाग्राम