Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वर्षाताईंनी पहिल्याच दिवशी अंशुमन विचारे म्हणून मला...", पॅडी कांबळेने सांगितला मजेशीर किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 18:04 IST

'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे.

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. दरम्यान, यंदाच्या पाचव्या पर्वातून अभिनेता पंढरीनाथ कांबळे घराबाहेर पडला. प्रेक्षकांच्या मिळालेल्या कमी मतांमुळे पॅडीला घराचा निरोप घ्यावा लागला. 'बिग बॉस'मध्ये पॅडीचा हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी कमालीची होती. पॅडीने अनेकदा एक ओळींच्या पंचचा टायमिंग साधून पॅडीने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. सुरुवातीच्या काळामध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरात शांतपणे वावरणारा पॅडीने आपला खेळ दाखवायला सुरूवात केली होती. पण, अखेरीस त्याचा प्रवास हा थांबला. शिवाय अभिनेत्री वर्षा उसगांवकरही घराबाहेर आल्या आहेत.

नुकतीच विनोदवीर पॅडी कांबळेने 'लोकमत फिल्मी'सोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान, त्याने 'वंडर गर्ल' वर्षा उसगांवकर यांच्याबाबतीत एक खुलासा केला आहे. दरम्यान, 'लोकमत फिल्मीसोबत बोलताना अभिनेता म्हणाला, "जेव्हा ताईंनी मला अंशुमन विचारे म्हणून हाक मारली. तेव्हा मला वाटलं अरे तुम्ही तर इंडस्ट्रीमधील आहात निदान तुमच्याकडून तरी असं होता कामा नये. बाकी इतर लोकांनी ओळखलं नाही तर गोष्ट वेगळी आहे. पण, म्हटलं ठीक आहे आपला घरात पहिलाच दिवस आहे. त्यानंतर माझं नाव त्याच्या कायम लक्षात राहिलं". 

पुढे पॅडी म्हणाला, "मला ताईंची एक गोष्ट आवडली ती म्हणजे बाहेर मला पंढरी या नावाने खूप कमी लोक हाक मारतात. पण, ताई सातत्याने पंढरी नावाने हाक मारायच्या त्यांच्या तोंडून कधी पॅडी असं निघालं नाही".

टॅग्स :बिग बॉस मराठीवर्षा उसगांवकरभातटिव्ही कलाकार