मराठमोळा रिल स्टार आणि इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं आज निधन झालं. प्रथमेशच्या निधनामुळे त्याच्या सर्व चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. आज त्याची प्राणज्योत मालवली. प्रथमेश अनेकांचा आवडता सोशल मीडिया स्टार होता. त्याचे अनेक मित्रही होते. अशातच कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने प्रथमेशविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे. अंकिताची प्रथमेशसाठी व्यक्त केली खंतअंकिताने सोशल मीडियासमोर प्रथमेशचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ''प्रथमेश आज तुझ्या अंत्यदर्शनाला तुझ्या घरी आले. तू कित्येक वेळा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण कधीच येणं जमलं नाही. आज तुझ्या आईला हतबल पाहून काय घडलंय, हे क्षणभर कळलंच नाही. ज्या घरात कधी येता आलं नाही, त्या घरात आज तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं. काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत, काही भेटी राहून गेल्या ह्याची खंत राहील.... जिथे असशील तिथे असंच हसत रहा!''
Web Summary : Social media influencer Prathamesh Kadam passed away after illness, leaving fans in mourning. Ankita expressed grief, regretting missed visits and offering condolences to his mother. She reminisced about his invitations and his vibrant spirit.
Web Summary : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रथमेश कदम का बीमारी के बाद निधन हो गया, जिससे प्रशंसक शोक में हैं। अंकिता ने दुख व्यक्त किया, मुलाकातों से चूकने पर अफसोस जताया और उनकी मां को संवेदनाएं दीं। उन्होंने उनके निमंत्रण और जीवंत स्वभाव को याद किया।