टेलिव्हिजन अभिनेत्री चारू असोपा आणि तिचा एक्स पती राजीव सेन यांच्यातील नात्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी, राजीवने नुकतेच काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्यात पॅच-अप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजीव सेनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.
एका फोटोमध्ये चारू राजीवच्या खांद्यावर डोके ठेवून हसताना दिसत आहे. या फोटोंसोबत राजीवने कोणतीही कॅप्शन लिहिलेली नाही, पण केवळ हसणाऱ्या चेहऱ्याची इमोजी दिली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्यात पुन्हा एकदा सर्व काही ठीक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. राजीव आणि चारू यांचा जून २०१९ मध्ये विवाह झाला होता आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगी आहे, जिचे नाव जियाना आहे. घटस्फोटानंतरही ते दोघे जियानासाठी अनेकदा एकत्र येत होते. हे नवीन फोटो पाहता, त्यांच्या नात्याला एक नवीन सुरुवात मिळाली असल्याची शक्यता आहे.
या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्स करुन आनंद व्यक्त केलाय. ''आमचा विश्वास करा, तुम्ही एकत्र खूप छान दिसत आहात''. आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं की, ''राजीव आणि चारु, तुम्हा दोघांना एकत्र बघून आनंद झाला. प्लीज तुम्ही एकत्र राहा. तुमच्यातलं प्रेम दिवसेंदिवस खूप घट्ट होतंय. याशिवाय तुमची मुलगी जियाना सुद्धा एक आनंदी मुलगी होईल.'', अशा शब्दात नेटकऱ्यांनी दोघांना प्रेम दर्शवलं आहे. चारु आणि राजीव यांनी एकत्र गणेश चतुर्थी साजरी केली. सध्या हे दोघेही एकत्र मुलगी जियानाचं एकत्र पालकत्व स्वीकारत आहेत.