Join us

तृषा कृष्णनवर राजकीय नेत्याची आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्री कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 12:43 IST

मन्सूर अली खाननंतर तृषा कृष्णनवर पुन्हा एकदा अश्लील कमेंट, यावेळी राजकीय नेत्याविरोधात तृषा कायदेशीर कारवाई करणार

दाक्षिणात्य अभिनेत्री तृषा कृष्णनबद्दल (Trisha Krishnan)अभिनेता मन्सूर अली खानने आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर बराच वाद झाला होता. आता AIADMK चे माजी नेता ए व्ही राजू( A V Raju) यांनी तृषासंदर्भात एक अश्लील टिप्पणी केली आहे. आता तृषा  ए व्ही राजू यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित आहे. राजू यांच्या वक्तव्यावर तृषा भडकली असून तिने थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

तृषा कृष्णन साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकत्याच आलेल्या 'पोन्नियन सेल्व्हन', 'लिओ' या सिनेमांमध्ये ती झळकली. आधी मन्सूर अली खान आणि आता ए व्ही राजू यांनी तिच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर आता तृषाने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ती लिहिते, "अशा तुच्छ व्यक्ती केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे पाहून अतिशय चीड येते. यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल.आता या पुढे माझी कायदेशीर टीम कारवाई करेल."

काय आहे नेमकं प्रकरण?

ए व्ही राजू यांनी दावा केला होता की तृषाला एका आमदाराने रिसॉर्टवर बोलवले. तिला यासाठी मोठी रक्कमही मिळाली. ए व्ही राजू यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका युझरने यावर तृषाला टॅग करत कारवाई केली पाहिजेस असे लिहिले. ए व्ही राजू यांच्यावर सणकून टीका झाली आणि सोशल मीडियावर कारवाईची मागणी सुरु झाली. 

टॅग्स :Tollywoodराजकारणपोलिससोशल मीडियासिनेमा