Join us

कॅन्सरशी झुंज अपयशी! 'सिंघम' फेम लोकप्रिय अभिनेत्याचं ७१ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 09:26 IST

सिंघम सिनेमात झळकलेले लोकप्रिय अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

प्रसिद्ध तमिळ अभिनेते आणि विनोदी कलाकार माधन बॉब यांचे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर होता. माधव हे कॅन्सरशी झुंज देत होते. परंतु ३ ऑगस्ट रोजी चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. माधन बॉब यांचे खरे नाव एस. कृष्णमूर्ती होते. त्यांनी अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले होते आणि त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे ते प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. 'अरुणाचलम', 'गिरी', 'सिंघम' आणि 'शिवा' यांसारख्या प्रसिद्ध साउथ सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.माधन यांच्या निधनाने पसरली शोककळा

चित्रपटात काम करण्यापूर्वी माधन बॉब हे एक संगीतकार होते. त्यांनी सुरुवातीला अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले. ते काही टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणूनही झळकले होते. माधन यांनी 'चाची ४२०' या बॉलिवूड सिनेमातही काम केलंय. रजनीकांत, कमल हासन यांसारख्या दिग्गजांसोबत माधन बॉब झळकले होते. माधन यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माधन यांच्या जाण्यामुळे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक हसरा आणि लोकप्रिय चेहरा हरपला आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माधन बॉब यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. माधन यांनी त्यांच्या कारकीर्दीत तब्बल १५० हून अधिक तमिळ सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी त्यांच्या भूमिकांनी लोकांना खळखळून हसवलं आणि मनोरंजन केलं.

टॅग्स :Tollywoodबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार