Join us

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत कोमामध्ये, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल, चाहत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:53 IST

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अभिजीत मजुमदार कोमामध्ये गेले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना भुवनेश्वरमधील एम्स रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांचे चाहते आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. अभिजीत मजुमदार यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना तातडीने आयसीयूमध्ये ठेवले.

सध्या ते कोमात असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांच्या आजाराबद्दल कोणतीही सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु त्यांची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांची टीम अथक प्रयत्न करत आहे.

अभिजीत मजुमदार हे ओडिशाच्या संगीत उद्योगातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि संगीताने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यांची गाणी केवळ ओडिशाच नाही, तर देशा-विदेशातही लोकप्रिय आहेत. ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अभिजीत मजुमदार यांनी आपल्या प्रतिभेने अनेक तरुण कलाकारांना प्रेरणा दिली आहे, त्यामुळे ही घटना ओडिशाच्या संगीत क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यासाठी भावनिक संदेश पोस्ट करत आहेत. याशिवाय ते लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.

टॅग्स :एम्स रुग्णालयओदिशामराठी गाणीमराठी चित्रपटबॉलिवूडTollywood