Join us

'पुन्हा लग्नच करणार नाही समंथा?' घटस्फोटाची आकडेवारी शेअर करत दिलं चाहत्याला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 09:39 IST

एका चाहत्याने समंथाला विचारले, 'तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करते आहेस का?'

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) सध्या अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. घटस्फोट आणि त्यानंतर मायोसायटिस आजाराचं निदान यामुळे समंथा कठीण काळातून जात आहे. ब्रेक घेण्यापूर्वी 'खुशी' हा तिचा शेवटचा सिनेमा होता. सध्या ती आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. नुकतंच समंथाने सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा तिने एका चाहत्याच्या प्रश्नावर दुसऱ्या लग्नाविषयी खुलासा केला. 

इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सेशनदरम्यान एका चाहत्याने समंथाला विचारले, 'तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करते आहेस का?' यावर तिने गुगल सर्चवरुन दुसरे लग्न किती टक्के टिकू शकतं याची आकडेवारीच दाखवली. तिने फोटो शेअर करत लिहिले,'आकडेवारी पाहता ही खूपच वाईट गुंतवणूक ठरेल.' यासोबतच तिने हसण्याचे इमोजी पोस्ट केले. समंथाने गुगलवरुन घटस्फोटाचा डेटाच शेअर केल्याने चाहतेही अवाक झाले. 

समंथाने शेअर केलेल्या आकडेवारीत असे दिसले की 2023 मध्ये पहिल्या लग्नात घटस्फोटाचं प्रमाण जवळपास 50 टक्के होतं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या लग्नात 67 टक्के आणि 73 टक्के होतं. यावरुन दुसरं लग्नही काही चांगला विचार नाही असाच निष्कर्ष समंथाने काढलेला दिसतोय. म्हणजे समंथा पुन्हा लग्नच करणार नाही या चर्चांना उधाण आलंय.

समंथाने साऊथ अभिनेता नागा चैतन्यसोबत 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. नागा चैतन्य हा साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. समंथा आणि नागा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांचं अतिशय ग्रँड वेडिंग झालं. पण लग्नानंतर चारच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. यामागे नक्की काय कारण होतं यावर कोणीच स्पष्ट उत्तर दिलं नाही.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीलग्नघटस्फोटसोशल मीडियाबॉलिवूड