Join us

पंजूर्ली देवाचा इतिहास अन् बरंच काही! 'कांतारा चाप्टर १'चा भव्यदिव्य ट्रेलर बघून येईल अंगावर काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:37 IST

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. बातमीवर क्लिक करुन बघा ट्रेलर

२०२२ मध्ये गाजलेल्या 'कांतारा'च्या अपार यशानंतर प्रेक्षकांमध्ये 'कांतारा चाप्टर १'विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे. २०२५ मधील भव्यदिव्य सिनेमांपैकी एक असलेला हा चित्रपट आहे. 'कांतारा चाप्टर १' हा होम्बळे फिल्म्सचा यावर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. हा एक भव्य पॅन-इंडिया चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. काय आहे 'कांतारा चाप्टर १'च्या ट्रेलरमध्ये? 

'कांतारा चाप्टर १'चा ट्रेलर 

'कांतारा चाप्टर १'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, ज्या ठिकाणी 'कांतारा'चा शेवट झाला त्याच ठिकाणी चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. आपले वडील जंगलातून अचानक गायब का झाले, हा प्रश्न मुलाला पडलेला असतो. नंतर त्या मुलासमोर पंजूर्ली देवाची कहाणी उलगडली जाते. 'कांतारा चाप्टर १'चा ट्रेलर नंतर भूतकाळात जातो. जिथे जंगलात एका राजाचं राज्य असतं. याच जंगलाच सामान्य नागरीकही असतात. या नागरिकांचा म्होरक्या म्हणून ऋषभ शेट्टी दिसतो. ऋषभचं जंगलावर प्रेम असतं. परंतु जुलमी राजा त्यांचं जंगल उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या बाजूने उभा राहत ऋषभ शक्तीशाली राजाविरोधात लढा देतो. पुढे काय होतं हे 'कांतारा चाप्टर १' आल्यावरच कळेल.

'कांतारा चाप्टर १'च्या ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी फारसे तपशील उघड न करता, एक गूढतेचा माहोल तयार केला आहे. या प्रीक्वलमधील रहस्यच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. ट्रेलरच्या शेवटी जमिनीखाली वास्तव्यास असलेल्या देवाचा रौद्रावतार बघायला मिळतो. अशाप्रकारे 'कांतारा चाप्टर १'चा ट्रेलर सर्वांना भुरळ घालणारा आहे. २ ऑक्टोबर २०२५ ला 'कांतारा चाप्टर १' जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. 'कांतारा'ला जे सुपरहिट यश मिळालं तसंच यश 'कांतारा चाप्टर १'ला मिळेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

टॅग्स :बॉलिवूडTollywoodटिव्ही कलाकारमराठीहॉलिवूड