मनोरंजन विश्वातून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अभिनेत्रीचे जोरात केस ओढताना दिसतोय. हा अभिनेता आहे प्रदीप रंगनाथन. अभिनेता आणि निर्माता असलेला प्रदीप त्याची सिनेमातील सह-अभिनेत्री मामिथा बैजूचे (Mamitha Baiju) केस जोरात ओढताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. जाणून घ्या.
प्रदीप आणि मामिथाचा व्हिडीओ चर्चेत
प्रदीप आणि मामिथा त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'डूड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते. मात्र या प्रमोशनल इव्हेंटमध्ये प्रदीपने केलेल्या एका कृत्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या 'डूड' चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये प्रदीप रंगनाथन आणि मामिथा बैजू या दोघांनी चित्रपटातील एक सीन रिक्रिएट करण्याचा निर्णय घेतला.
मूळ ट्रेलरमध्ये मामिथा प्रदीपचा गाल खेचते, ज्यावर प्रदीप 'नॉट क्यूट' असं म्हणतो. पण या इव्हेंटदरम्यान भूमिकांची अदलाबदल करण्यात आली. प्रदीपऐवजी मामिथा स्टेजवर नाराज असल्याचा अभिनय करत असताना, प्रदीपने तिचा गाल ओढण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर अचानक त्याने मामिथाचे केस पकडून तिला आपल्याकडे खेचले. दोघांचा हा परफॉर्मन्स पाहणाऱ्या प्रेक्षकांना क्षणभर धक्का बसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटिझन्सनी प्रदीप रंगनाथनवर टीका करण्यास सुरुवात केली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी प्रदीप रंगनाथनच्या या वर्तनाला 'शोषण' असं म्हटलं आहे. प्रमोशनल स्टंटच्या नावाखाली हे गैरवर्तन असून त्याचा प्रेक्षकांकडून निषेध करण्यात आला आहे. "प्रमोशनच्या नावाखाली हे उघड शोषण आहे.", "मला खात्री आहे की मामिथाला हा चित्रपट केल्याबद्दल नक्कीच पश्चात्ताप होत असेल.", "चित्रपटातील सीन्स रीक्रिएट करणं ठीक आहे, पण त्यासाठी वेगळे मार्गही आहेत." अशा शब्दात नेटकऱ्यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.
काहींनी मात्र हा सीन रिक्रिएट करणं हा सिनेमाच्या इव्हेंटचा भाग असल्याचं सांगितलं. कारण प्रदीपने जरी ही कृती केली तरी नंतर अभिनेत्री मामिथा हसताना दिसली आणि तिने प्रदीपचे आभारही मानले होते. कीर्तिस्वरण लिखित आणि दिग्दर्शित 'डूड' हा चित्रपट १७ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नेहा शेट्टी, द्रविड सेल्वम आणि आर शरतकुमार यांसारखे कलाकार देखील आहेत.
Web Summary : During a promotional event for 'Dude,' actor Pradeep Ranganathan sparked controversy by forcefully pulling co-star Mamitha Baiju's hair while recreating a scene. The act, deemed inappropriate by many, drew sharp criticism online, with some calling it 'abuse' under the guise of promotion. Others defended it as part of the event.
Web Summary : 'Dude' के प्रमोशन के दौरान, अभिनेता प्रदीप रंगनाथन ने सह-कलाकार मामिथा बैजू के बाल खींचे, जिससे विवाद हो गया। कई लोगों ने इसे अनुचित बताया और ऑनलाइन आलोचना की, कुछ ने इसे प्रमोशन के नाम पर 'दुर्व्यवहार' कहा। कुछ ने इसे इवेंट का हिस्सा बताया।