चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोकप्रिय अभिनेते संतोष के. नायर यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. सकाळी केरळमधील अदूर येथे भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांची पत्नी राजलक्ष्मी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास अदूर एनाथजवळील एमसी रोडवर पुदुस्सेरी परिसरात झाला. संतोष नायर त्यांच्या पत्नीसह इनोवा कारने प्रवास करत असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या ट्रकसोबत कारची जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने संतोष नायर यांना तातडीने अदूर लाइफ लाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कारमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ट्रक चालक सुधीश हा देखील या अपघातात जखमी झाला आहे.
कोण होते संतोष नायर?संतोष नायर हे मल्याळम चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील एक ओळखीचा चेहरा होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. 'मोहिनीअट्टम' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
या अचानक झालेल्या अपघातामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
Web Summary : Popular Malayalam actor Santhosh K. Nair died in a car accident in Kerala. His wife, Rajalakshmi, was seriously injured. The car collided with a truck, resulting in extensive damage. Nair acted in over 100 films and TV series.
Web Summary : लोकप्रिय मलयालम अभिनेता संतोष के. नायर का केरल में एक कार दुर्घटना में निधन हो गया। उनकी पत्नी, राजलक्ष्मी गंभीर रूप से घायल हो गईं। कार एक ट्रक से टकरा गई, जिसके परिणामस्वरूप व्यापक क्षति हुई। नायर ने 100 से अधिक फिल्मों और टीवी श्रृंखलाओं में अभिनय किया।