Join us

कधी अडकणार लग्नाच्या बेडीत? चाहत्याच्या प्रश्नाला श्रुती हसनने दिले उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:46 IST

श्रुती हासन कधी अडकणार लग्नाच्या बेडीत; म्हणाली...

दिग्गज अभिनेते कमल हासन यांची लेक श्रुती हासन कायम चर्चेत असते. श्रुतीने बॉलिवूड ते साऊथपर्यंत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. श्रुतीचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम त्यांच्या संपर्कात राहते. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठलेली श्रुती रिअल लाइफमध्ये मात्र अद्याप सिंगल आहे. अनेकदा श्रुतीला तिच्या लव्हलाइफबद्दल विचारण्यात आलं आहे. आता तर एका चाहत्यानेच तिला थेट लग्नाबद्दल विचारलं आहे. 

अलिकडेच श्रुतीने इन्स्टाग्रामवर 'Ask me a  Question' हे सेशन ठेवलं होतं. चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी चाहत्यांनी तिला लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारलं.  एका चाहत्याने तिला विचारलं, "मागील वेळीही मी तुला हाच प्रश्न विचारला होता, तू उत्तर दिले नाहीस? तु लग्न कधी करणार आहेस?" चाहत्यांच्या या प्रश्नाला श्रुती हसनने उत्तर दिले. ती म्हणाली, "नाही आणि आता हे प्रश्न विचारणे बंद करा". श्रुतीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रुतीला तिच्या खाजगी आयुष्यावर भाष्य करणे जास्त आवडत नाही. 

श्रुती हासन तिच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपुर्वी तिचं बॉयफ्रेंड शांतनू हजारिकासोबतचं चार वर्षांचं नातं संपलं. शांतनूच्या आधी तिनं मायकल कॉर्सेलला डेट केलं होत. तर त्याहीआधी श्रुतीचं नाव धनुष, नागा चैतन्य, सुरेश रैना आणि रणबीर कपूर यांसारख्या स्टार्ससोबत जोडलं गेलं होतं.  वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच प्रभासच्या 'सालार' सिनेमात झळकली होती. याशिवाय तिचा हॉलिवूड चित्रपट 'द आय' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रुतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

टॅग्स :श्रुती हसनकमल हासनलग्नसोशल मीडियाइन्स्टाग्राम