Join us

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:06 IST

रुपाली गांगुलीनेतच मोडला माझ्या आईवडिलांचा संसार, सावत्र लेकीचे गंभीर आरोप

'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रुपालीच्या सावत्र मुलीने २०२० साली तिच्यावर अनेक आरोप केले होते जे आता व्हायरल होत आहेत. या आरोपांवर रुपालीच्या पतीने नुकतंच स्पष्टीकरणही दिलं होतं. पण आता सावत्र मुलगी ईशा वर्माने (esha verma) रुपालीवर आणखी नवे आरोप केले आहेत. नुकतीच तिने एका मुलाखत दिली ज्यामध्ये तिने आणखी काही खुलासे केले.

माझ्या वडिलांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचा घटस्फोट होण्यामागे रुपालीचा सहभाग नव्हता असं ते म्हणाले. पण हे साफ खोटं आहे. रुपाली आमच्या न्यू जर्सी येथील घरी आली होती आणि माझ्या आईच्या बेडवर झोपली होती. तोच बेड जो माझे आईबाबा शेअर करायचे. रुपाली मला आणि माझ्या आईला मानसिक, शारिरीक आणि भावनिक त्रास दिला आहे. आम्ही मोठ्या ट्रॉमाला सामोरे गेलो आहे. खूप सहन केलं आहे. रुपालीकडे सेलिब्रिटी असल्याने जे एक्सोजर आहे ते आमच्याकडे नाही."

रुपाली गांगुलीचे पती अश्विन वर्मा यांचं पहिलं लग्न सपना यांच्याशी झालं होतं. त्यांना ईशा आणि आणखी एक मुलगी आहे. २०२० साली ईशाने रुपालीवर अनेक आरोप केले होते.  वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. रुपालीनेच आपल्या आईवडिलांचा संसार मोडला असं ती म्हणाली होती. सध्या ईशा आपल्या आई आणि बहिणीसोबत न्यू जर्सीमध्ये राहते. तर अश्विन वर्मा रुपाली गांगुलीसोबत मुंबईत राहतात. त्यांना एक मुलगाही आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनलग्नघटस्फोट