Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाहावर रिचा चड्डाने पुन्हा केलं भाष्य, म्हणाली, "जर तुमचं कुटुंब..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:43 IST

रिचा चड्डाने अली फजलशी लग्न केलं तेव्हा बरीच चर्चा झाली होती

अभिनेत्री रिचा चड्डा (Richa Chadda)  सध्या 'हीरामंडी' वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिज तर प्रेक्षकांच्या पसंतीस पडलीच आहे शिवाय रिचाच्याही अभिनयाचं कौतुक होतंय. दुसरीकडे रिचा लवकरच आई होणार आहे. अली फजल आणि रिचा नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. २०२० साली रिचाने अली फजलशी आंतरधर्मीय विवाह केल्याने खूप चर्चा झाली होती. नुकतंच रिचाने यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रिचा म्हणाली, "जर तुम्ही तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवत असाल, त्याच्यासोबत उभे असाल आणि तुमचं कुटुंबही तुम्हाला साथ देत असेल तर तुम्हाला बाकी कोणत्याच गोष्टीचा फरक पडला नाही पाहिजे. जसं मी आधीही म्हणाले होते की आपण आधी माणूस आहोत आणि जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा ते फिल्टर शिवाय असते. प्रेम म्हणजे फक्त प्रेमच असतं."

ती पुढे म्हणाली,"अली आणि माझ्याबद्दल कुटुंबाला बाहेरुन किंवा माध्यमातून कळू नये अशीच माझी नेहमी इच्छा होती. म्हणूनच मी आधी माझ्या घरी सांगितलं आणि नंतर मी खुलेआम अलीसोबत फिरायचे."

रिचा आणि अली फजलने कोव्हिडच्या वेळी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्न केले होते. तेव्हा कोणालाच याची खबर नव्हती. घराजवळच असलेल्या कोर्चमध्ये जिथे अगदी शांतता असते तिथेच दोघांनी लग्न केले.

टॅग्स :रिचा चड्डाअली फजलबॉलिवूडलग्न