Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला कधी सिनेमे मागावे लागत नाहीत"; सोनू सूदच्या मदतीवर राजपाल यादवची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:03 IST

Rajpal yadav: सोनू सूदने दिलेल्या ऑफरवर राजपालने त्याच मत मांडलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

बॉलिवूडचा अष्टपैलू आणि विनोदी अभिनेता राजपाल यादव (rajpal yadav) सध्या चेक बाऊन्स प्रकरणी चांगलाच चर्चेत आहे.  चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याला तिहार तुरुंगात शिक्षा भोगावी लागली असून अलिकडेच त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. राजपालवर ओढावलेल्या या आर्थिक संकटामुळे कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्याला मदतीसाठी हात पुढे केला आहे. यामध्येच अभिनेता सोनू सूद याचाही समावेश आहे. सोनूने त्याला सिनेमाची ऑफर दिली. त्याच्या या ऑफरवर राजपालने प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच राजपाल यादव याने चेक बाऊन्स प्रकरणी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्सला त्याचे वकील भास्कर उपाध्याय हेदेखील उपस्थित होती. यावेळी राजपालने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. तसंच कलाविश्वातून त्याला मिळत असलेल्या प्रतिसादावरही त्याचं मत मांडलं.

राजपालवर ओढावलेल्या संकटामुळे त्याला आर्थिक मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सूद (sonu sod) याने मदतीचा हात पुढे केला होता. सोनूने त्याच्या आगामी सिनेमामध्ये राजपाल यादवला घेणार अशी घोषणाही केली होती. त्याच्या या ऑफरवर आता राजपालने त्याच मत मांडलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

मला कामाची गरज नाही!

''मला काम मागावं लागतंय, या गैरसमजातून कृपा करुन बाहेर या. आणि, काम मागण्यासाठी लाज वाटावी असंही काही नाहीये. मी माझ्या कामातूनच माझा उदनिर्वाह करतोय. सिनेमा माझं ध्येय आणि मी अशा पद्धतीने काम करतो की ज्यामुळे मला चार काम जास्तीचीच मिळतात'', असं राजपाल यादव म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ''मी सुट्टीच्या काळातही काम करतो. मला कामाचा शोध घ्यावा लागत नाही. गेल्या ११ वर्षांपासून काम माझ्यासोबतच आहे. यावर्षी मी प्रियनजी यांच्यासोबत भूत बंगला हा सिनेमा करतोय. त्याच्यानंतर वेलकम टू द जंगल आहे. यात २७ कलाकार आहेत. आणि, त्याच्यानंतर हैवान या सिनेमात काम करणार आहे. माझ्याकडे दोन वेबसीरिज आणि अन्य २ सिनेमा आहेत. ज्याविषयी मी जास्त बोलू शकणार नाही असे प्रोजेक्ट्स आहेत.''

राजपालच्या हातात प्रोजेक्टसच्या रांगा

येत्या ७ वर्षांत त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट असल्याचं त्याने या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. यात १ हजारपेक्षा जास्त अधिक किंमत असलेल्या ब्रांडिंग वेंचर्सचाही समावेश आहे.  सिनेमा सोडला तर अन्य चार प्रोजेक्टसाठी त्याने तडजोड केल्याचंही यावेळी सांगितलं. यात प्रत्येक प्रोजेक्टची किंमत ही २०० कोटींपासून ते २ हजार कोटींपर्यंत आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टच्या मूळ रक्कमेत राजपालची समान भागीदारी असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

दरम्यान, येत्या पुढील काळात तो आगामी १० सिनेमांमध्ये झळकणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. यावेळी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेने त्याला जी मदत केली त्यावरही भाष्य केलं. तसंच चाहत्यांचे आभारदेखील मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav responds: 'I don't need to ask for movies'.

Web Summary : Rajpal Yadav, recently out of jail, addressed Sonu Sood's movie offer amid financial struggles, stating he doesn't need to ask for work and has numerous projects lined up for the coming years.
टॅग्स :राजपाल यादवसोनू सूदसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडतुरुंग