Join us

'सिंगल मदर' आहे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री, घटस्फोटानंतर केला आर्थिक तंगीचा सामना? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:08 IST

1 / 8
'क्योकी सांस भी कभी बहु थी','कहानी घर घर की' या मालिकांच्या जमान्यात कुमकुम' ही मालिका २००२ ते २००९ साली आली होती. या मालिकेतून जुही परमार (Juhi Parmar) ही अभिनेत्री घराघरात पोहोचली होती.
2 / 8
जुही परमार आणि हुसैन यांची मालिकेतील जोडी गाजली होती. तीच जुही परमार सध्या काय करते माहितीये का? जुही सिंगल मदर असल्याचं खूप कमी जणांना माहित असेल.
3 / 8
२००९ साली जुहीने अभिनेता सचिन श्रॉफसोबत लग्न केलं होतं. सचिन श्रॉफही लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. तो सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये तारक मेहताच्या भूमिकेत आहे.
4 / 8
जुही आणि सचिन एका मालिकेच्या सेटवरच प्रेमात पडले होते. २००९ मध्ये त्यांनी जयपूरमध्ये लग्न केलं. २०१३ मध्ये त्यांना समायरा ही मुलगी झाली. मात्र काही मतभेदांमुळे दोघांनी २०१८ मध्ये घटस्फोट घेतला.
5 / 8
जुही सध्या एकटीच लेकीचा सांभाळ करत आहे. ती म्हणाली, 'मी नुसतं बसून रडणारी नाही. माझा स्वत:वर विश्वास आहे. तसंच किती खर्च करायचा आणि किती बचत करायची हे मला माहित आहे'
6 / 8
मला माझ्या मुलीला चांगलं आयुष्य, चांगलं शिक्षण द्यायचं आहे. मी तसा प्रयत्नही करत आहे. तिच्या भविष्यासाठी मला बचत करावीच लागणार आहे. कुठे ना कुठे मी ते सिक्युर केलं आहे. पण हो मला तिच्यासोबत खूप फिरायची इच्छा आहे जे आम्ही मायलेकी करतच असतो.'
7 / 8
'तिच्यासोबत मला प्रत्येक क्षण आनंदात जगायचा आहे. जेणेकरुन नंतर कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप होणार नाही.'
8 / 8
जुहीला २०१८ मध्ये घटस्फोट दिल्यानंतर ex पती सचिन श्रॉफने २०२३ साली चांदनी कोठीसोबत दुसरं लग्न केलं.
टॅग्स :टिव्ही कलाकारलग्नघटस्फोटपरिवारटेलिव्हिजन