By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 22:18 IST
1 / 7गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'चला हवा येऊ द्या' मधून झळकलेला प्रसिद्ध अभिनेता. गौरवच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारी एक बातमी आली आहे. ती म्हणजे गौरव मोरेने गुपचुप लग्न केलंय. 2 / 7हो तुम्ही बरोबर वाचताय! गौरव मोरेने गुपचुप लग्न केल्याची चर्चा आहे. गौरवची मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवेने पोस्ट शेअर करुन ही खास बातमी सर्वांना दिलीये. 3 / 7विशेष म्हणजे आजच गौरवने त्याच्या नवीन घरात प्रवेश केलाय. या वेळी गौरव आणि त्याच्या बायकोसोबत फोटो शेअर करुन ऋतुजाने खास पोस्ट लिहिली आहे.4 / 7''मिस्टर अँड मिसेस मोरे. तुमच्या नवीन प्रवासासाठी आणि नवीन घरासाठी मनापासून अभिनंदन. आयुष्यभर तुम्हाला असंच प्रेम, हास्य आणि आनंद मिळो ही सदिच्छा'', अशी पोस्ट लिहून ऋतुजाने गौरव आणि त्याच्या बायकोला टॅग केलंय.5 / 7गौरवच्या बायकोचं नाव आहे प्रियंका कारेकर. प्रियंकाचा सुद्धा मनोरंजन विश्वाशी संबंध असून तिने आर. बाल्की, गौरी देशपांडे यांसारख्या दिग्गज बॉलिवूड दिग्दर्शकांसोबत काम केलंय.6 / 7प्रियंका आणि गौरव गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रियंकाच्या प्रोफाईलवर गौरव आणि तिचे अनेक फोटो बघायला मिळतात. दोघांनीही त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा अद्याप केला नव्हता.7 / 7इतकंच नव्हे, गौरव आणि प्रियंकाने अधिकृतपणे लग्नाबद्दलही अजून कोणाला सांगितलं नाही. पण प्रियंकाच्या गळ्यात दिसलेलं मंगळसूत्र आणि ऋतुजाने लिहिलेली पोस्ट यावरुन दोघांचं लग्न झाल्याची दाट शक्यता आहे. गौरवच्या चाहत्यांना याविषयी कळताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.