'धुरंधर' आला तरीही फरक नाही पडला! ७४ वर्षीय अभिनेत्याच्या 'या' सिनेमाची ५० कोटींहून जास्त कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:25 IST
1 / 7सध्या देशभर नाही तर जगभरात 'धुरंधर' सिनेमाची चर्चा आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय.2 / 7या सिनेमाच्या सोबत कपिल शर्माचा 'किस किस को प्यार करु २' हा सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. पण 'धुरंधर'सोबत रिलीज झालेला एक सिनेमा मात्र चांगली कमाई करत आहे.3 / 7या सिनेमाचं नाव आहे 'कलमकवल' (kalamkaval). ७४ वर्षीय मामुटींची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेचच चर्चेत आला.4 / 7रिलीज होऊन ११ दिवस झाले असले तरीही 'कलमकवल' सिनेमाने अकराव्या दिवशी ३२ कोटींची कमाई केली आहे. एकूणच 'कलमकवल' सिनेमा चांगलाच गाजतोय.5 / 7अशाप्रकारे मामुटींच्या 'कलमकवल' सिनेमाने दोन आठवड्यात ७४ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत असल्याचं समजतंय.6 / 7२००३ ते २००९ या काळात मोहन कुमार या व्यक्तीने २० महिलांचा खून केला होता. सायनाईड मोहन केस म्हणून हे प्रकरण खूप गाजलं होतं.7 / 7याच केसवर आधारीत 'कलमकवल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ७४ वर्षीय मामुटींचा या सिनेमातील कधीही न पाहिलेला अंदाज पाहून लोक थक्क झाले आहेत