Sonali Sood Car Accident: कारचा चेंदामेंदा, एअरबॅग्जमुळे वाचली, सोनू सूदची पत्नी सोनालीच्या भीषण अपघाताचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:09 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर (Sonu Sood Wife Accident In Nagpur) मोठा अपघात झाला आहे. 2 / 10सोनेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धा उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघाताचे फोटो समोर आलेत. 3 / 10एका ट्रकला गाडी मागून धडकल्याने हा मोठा अपघात झाला. यात कारचे बोनेट पुर्णत: चेंदामेंदा झालं.4 / 10गाडीच्या झालेल्या अवस्थेवरुन अपघाताची भीषणता लक्षात येतंय. गाडीचा पुर्ण चक्काचूर झाला आहे.5 / 10पण, कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे सोनूची पत्नी वाचली आहे. सध्या ती रुग्णालयात डॉक्टारांच्या देखरेखीखाली आहे. 6 / 10अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये सोनूची पत्नी सोनाली, तिची बहीण आणि तिच्या बहिणीचा मुलगा होता, अशी माहिती आहे. 7 / 10सोनू सूदला अपघाताविषयी कळताच तो तातडीने मुंबईहून नागपूर पोहोचला आणि रुग्णालयात पत्नीची भेट घेतली. 8 / 10एवढ्या मोठ्या अपघातामधून पत्नी वाचल्यानंतर सोनू सूदने देवाचे आभार मानले. त्याने म्हटलं, 'साई बाबांच्या कृपेने कोणताही मोठा अनर्थ घडला नाही'.9 / 10सोनू व सोनाली यांचं लग्न १९९६ मध्ये झालं होतं. सोनाली व सोनू यांना अयान व इशांत ही दोन मुलं आहेत.10 / 10सोनाली अभिनयासोबतच सोनूसोबत सामाजिक कार्यात देखील पुढे असते.