1 / 7दिल धडकने दो, दिल्ली क्राईम यांसारख्या प्रसिद्ध सिनेमा आणि वेबसीरिजमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली शाह. शेफालीचे एक्स पतीही बलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत हे फार कमी जणांना ठाऊक असेल. 2 / 7शेफाली शाहच्या एक्स पतीचं नाव आहे हर्ष छाया. 'हसरतें' या टीव्ही शोच्या सेटवरून सुरू झालेली त्यांची मैत्री लग्नापर्यंत पोहोचली होती. १९९४ मध्ये त्यांनी लग्न केले, मात्र ६ वर्षांनंतर म्हणजेच वर्ष २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.3 / 7हर्ष छायाने सांगितले की, त्यांचा घटस्फोट होणार आहे याचा अंदाज त्याला ८-९ महिने आधीपासूनच आला होता. जेव्हा मला सांगण्यात आले की 'मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही', त्याच्या आधीपासूनच मी मानसिकदृष्ट्या यासाठी तयार होतो.4 / 7घटस्फोटानंतरच्या परिस्थितीवर बोलताना हर्षने सांगितले की, समाजात या शब्दाकडे नकारात्मकतेने पाहिले जाते, ज्यामुळे अनेक लोक वर्षानुवर्षे चुकीच्या लग्नात अडकून राहतात.5 / 7''जबरदस्ती स्वतःला खंबीर दाखवण्याची गरज नाही. मी स्वतः ५-६ महिने हा त्रास सहन केला, रडलो, ओरडलो, मला पश्चातापही झाला आणि नंतर मनाला विचलित करण्यासाठी डेटिंगही सुरू केली. मी २-३ महिन्यांत अनेक डेट्सवर गेलो. यातून बाहेर पडायला वेळ लागतो, त्यामुळे भावना व्यक्त करणे गरजेचे आहे.', असंही हर्ष म्हणाला.6 / 7तो पुढे म्हणाला की, दोन व्यक्ती २४ तास एकत्र राहू शकत नाहीत, त्यामुळे नाते विनाकारण ओढत नेण्यापेक्षा जर वेगळे व्हायचे असेल, तर ते जितक्या लवकर होईल तितके चांगले.7 / 7हर्ष छायापासून वेगळे झाल्यानंतर शेफाली शाहने वर्ष २००० मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक विपुल शाह यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता २५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना आर्यमन आणि मौर्य ही दोन मुले आहेत. दुसरीकडे, हर्ष छायाने शेफालीपासून वेगळे झाल्यानंतर ३ वर्षांनी, म्हणजेच २००३ मध्ये सुनीता सेनगुप्ता हिच्याशी विवाह केला.