Join us

दाक्षिणात्य सिनेमात अप्सरेच्या घायाळ करणाऱ्या अदा! सोशल मीडियावर फोटोंचा धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:17 IST

1 / 10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप पाडली आहे.
2 / 10
सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या खास अंदाजातील फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
3 / 10
सध्या सोनाली एका दाक्षिणात्य चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे. 'मलैकोटै वालिवन' या दाक्षिणात्य सिनेमात सोनाली महत्वाच्या भूमिकेत आहे.
4 / 10
सोनालीचा 'मलैकोटै वालिवन' हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
5 / 10
या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. अप्सरेच्या घायाळ करणाऱ्या अदा या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.
6 / 10
सोनाली शेयर केलेल्या फोटोमध्ये ती बैलगाडीत बसलेली दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिन लिहलं, 'रंगरानी chilling in her कालावंडी / बैलगाडी / bullock cart!' तिच्या या फोटोंचा सोशल मीडियावर धुरळा उडाला आहे.
7 / 10
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'सुंदर', 'कुछ ना कहो!... कुछ भी ना कहो!...क्या कहना है...क्या सुनना है...तुमको पता है....हम फॅन्स को भी पता है' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
8 / 10
'मलैकोटै वालिवन' हा सिनेमा लिजो पेलिसरी यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सोनाली दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर तिनं स्क्रीन शेअर केली आहे.
9 / 10
हा चित्रपट मल्याळमसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे शूटिंग 130 दिवस राजस्थान, चेन्नई आणि पुद्दुचेरीसह अनेक ठिकाणी झाले आहे.
10 / 10
सोनाली कुलकर्णीला दाक्षिणात्य सिनेमात पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. सोनालीने अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना मराठी इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठला आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीसिनेमाTollywoodबॉलिवूडसोशल मीडिया