Join us

ऐश्वर्या राय की कतरिना कैफ... सलमान खानच्या X-गर्लफ्रेंडपैकी कोण जास्त श्रीमंत? दोघींची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 21:28 IST

1 / 9
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला आहे. एकामागून एक हिट चित्रपट देणारा सलमान खान ५९ व्या वर्षीही अविवाहित आहे.
2 / 9
सलमान खानची आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर्सची चर्चा रंगली, पण तरीही सलमान अविवाहितच राहिला. त्याचे कोणतेही रिलेशनशिप लग्नापर्यंत पोहोचले नाही.
3 / 9
सलमान खानचे सर्वाधिक चर्चेत असलेले अफेअर ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यासोबत होते. दोघींनीही बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले. या दोघींपैकी श्रीमंत कोण, जाणून घेऊया.
4 / 9
२००५ मध्ये आलेल्या 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटादरम्यान कतरिना कैफ आणि सलमान खान एकमेकांच्या खूप जवळ आले. तेथून या दोघांचे रिलेशन सुरू झाले असे म्हणतात.
5 / 9
पण चार वर्षांनी सलमान आणि कतरिनाचे ब्रेकअप झाले. २००३ मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या कतरिनाचा समावेश टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे.
6 / 9
कतरिना कैफ हिने अभिनेता विकी कौशल याच्याशी लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाची सध्या एकूण संपत्ती सुमारे २२४ कोटी आहे. ती एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी रुपये घेते.
7 / 9
कतरिनाच्या आधी सलमानचे ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिप होते. १९९९ मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात काम करताना दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले, असे म्हटले जाते.
8 / 9
ऐश्वर्या खूपच सुंदर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रभावी अभिनेत्री. पण हे नातेही लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. एकमेकांवर नितांत प्रेम असणाऱ्या या जोडीचे २००२ मध्ये ब्रेकअप झाले.
9 / 9
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केले. ती सुमारे ९०० कोटी रुपयांची मालकीण असून भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तीही एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये घेते.
टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चनकतरिना कैफपैसाबॉलिवूडव्यवसायविकी कौशलअभिषेक बच्चन