Join us

"सकाळी १०.३० ला जेवायचो तर संध्याकाळी.."; राम कपूरने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा उपाय

By देवेंद्र जाधव | Updated: July 19, 2025 16:59 IST

1 / 7
राम कपूर हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. बॉलिवूड सिनेमे आणि हिंदी टेलिव्हिजनमधून राम कपूरने विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मन जिंकलंय.
2 / 7
राम कपूरने अलीकडेच सर्वांना थक्क करणारी एक गोष्ट केली ती म्हणजे वजन कमी करणं. १४० किलो वजनावरुन राम कपूरचं वजन ८५ किलो झालं. यामागचं सोपा आणि प्रभावी उपाय राम कपूरने सांगितला
3 / 7
एका मुलाखतीत राम कपूरने वजन कमी कसं केलं ते सांगितलं. राम कपूर दिवसातून फक्त दोन वेळा पूर्ण जेवण जेवायचा. सकाळचं जेवण तो १०.३० वाजता करायचा. तर संध्याकाळी ६.३० वाजता दुसऱ्यांदा जेवायचा.
4 / 7
सकाळी १०.३० आणि संध्याकाळी ६.३० च्या मध्ये राम कपूर काहीच खायचा नाही. स्नॅक्स, चिप्स किंवा बाहेरील पदार्थ या मधल्या वेळात खाणं तो टाळायचा.
5 / 7
या व्यतिरिक्त शरीराला आवश्यक असलेलं पाणी तो प्यायचाच. शिवाय चहा आणि कॉफी या पदार्थांचं सेवन करायचा. या व्यतिरिक्त तो काहीही खायचा नाही.
6 / 7
कुठे पार्टी असेल तर राम कपूर आवर्जुन जायचा. मध्यरात्री २ वाजेपर्यंत पार्टीचा आनंदही घ्यायचा. परंतु काहीही खायचा नाही. सूर्यास्तानंतर तुम्ही काही खाऊ नका, असा सल्ला रामने सर्वांना दिलाय.
7 / 7
राम कपूरची ही वेट लॉस जर्नी सर्वांना थक्क करुन गेली आहे. राम कपूरने सांगितलेला उपाय इतका सोपा आहे की अनेकजण तो फॉलो करुन स्वतःचं वजन कमी करु शकतात.
टॅग्स :राम कपूरवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना