Join us

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:11 IST

1 / 7
सध्या जगभरात कान्स फिल्म फेस्टिव्हलची चांगलीच चर्चा आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी या फेस्टिव्हलला हजेरी लावत आहेत
2 / 7
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी एक २२ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री सहभागी झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का सेन.
3 / 7
अनुष्का सेन पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. अनुष्काच्या ग्लॅमरस लूकने जगाचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलंय
4 / 7
जांभळ्या रंगाच्या फ्लोरस गाऊनमध्ये अनुष्काने कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. रेड कार्पेटमध्ये अनुष्काने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या.
5 / 7
याशिवाय अनुष्काने रेड कार्पेटवर कोरिअल हार्ट इमोजी असलेलं साइन बनवत खास पोज दिली. अवघ्या २२ व्या वर्षी जगातल्या दिग्गज व्यक्तींसोबत अनुष्काला कान्समध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे
6 / 7
टीव्ही इंडस्ट्रीपासून अनुष्काने अभिनय प्रवासाला सुरुवात केली. अनुष्काने दिल, दोस्ती, डिलेमा या वेबसीरिजमध्ये साकारलेल्या अभिनयाचं खूप कौतुक झालं
7 / 7
अनुष्का सेनच्या ग्लॅमरस लूकने तिने तिच्या चाहत्यांची पसंती मिळवली आहे. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर अनुष्काने २२ व्या वर्षी कान्समध्ये केलेलं पदार्पण लक्षवेधी ठरलंय
टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलबॉलिवूडटेलिव्हिजनहॉलिवूड