1 / 7आर. माधवन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो वयाच्या ५५ व्या वर्षीही अत्यंत फिट आणि तरुण दिसतो2 / 7कोणत्याही वर्कआउटशिवाय केवळ आपल्या जीवनशैलीत बदल करून स्वतःला ट्रान्सफॉर्म केले आहे. याशिवाय खाणं खातानाचे खास फंडे आर.माधवनने सांगितले आहेत. हे फंडे आपल्या प्रत्येकाच्या घरी आजी-आजोबांनी सांगितले असतील3 / 7माधवन आपले अन्न किमान ४५ ते ६० वेळा चावून खातो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्नातील पोषक तत्वे शरीराला नीट मिळतात.4 / 7संध्याकाळी ६.४५ च्या दरम्यान आर. माधवन आपलं जेवण आटपतो. याशिवाय दुपारी ३.३० नंतर तो फक्त शिजवलेले पदार्थ खातो. कच्चं काहीच खात नाही.5 / 7दिवसभरात आर. माधवन भरपूर पाणी पितो. याशिवाय पचनक्रिया आणखी चांगली करण्यासाठी तो पालेभाज्या आवर्जून खातो. 6 / 7माधवन दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेण्यावर भर देतो. शरीर पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक असल्याचे तो मानतो. याशिवाय सकाळी उठल्यावर जिमला न जाता तो चालण्यावर भर देतो.7 / 7झोपण्यापूर्वी एक-दीड तास तो मोबाईलला दूर ठेवतो. अशाप्रकारे आर.माधवन स्वतःच्या फिटनेसला प्राधान्य देतो.