By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:54 IST
1 / 7३७ वर्षीय अभिनेत्री कृतिका कामराने काहीच दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड गौरव कपूरसोबत लग्न केलं. ३७ हे लग्नाचं वय नाही असं अनेकांना वाटतं. परंतु कृतिकाने उशीरा लग्न करण्याचे फायदे सांगितले आहेत. काय म्हणाली बघा2 / 7११ मार्च २०२६ ला कृतिकाने अभिनेता आणि क्रिकेट समालोचक गौरव कपूरसह लग्न केलं. नुकत्याच एका मुलाखतीत कृतिकाने तिच्या लग्नाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली आणि मनातील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.3 / 7माझ्या मित्रांनी १०-१५ वर्षांपूर्वी लग्न केलं. कारण त्यांच्यावर तसा दबाव होता परंतु माझ्यावर असं कोणतंही प्रेशर नव्हतं. मी याविषयी स्वतःला नशीबवान मानते की माझ्या आई-वडिलांनी मला हवी ती गोष्ट करुन दिली, असं कृतिका म्हणाली. 4 / 7कृतिका पुढे म्हणते की, लग्न केल्यानंतर मला सर्व आधीसारखंच वाटत आहे. काही विशेष बदल जाणवत नाहीये. माझं लग्न झालंय, हे मला स्वतःला कधीकधी सांगावं लागतं. पण ही चांगली गोष्ट आहे.5 / 7''उशीरा लग्न केल्यानंतर फायदा असा आहे की, जेव्हा तुम्ही पार्टनरशी विवाहबंधनात अडकता त्याआधी तुम्ही त्याला संपूर्णपणे ओळखलं असतं. तुम्ही तुम्हाला हवे ते निर्णय घेऊ शकता. माझे निर्णय हे माझे असतात. आणि गौरवच्या बाबतीतही तेच आहे.'', अशाप्रकारे कृतिकाने उशीरा लग्न केल्याचे फायदे सांगितले.6 / 7कृतिका-गौरवचं लग्न चांगलंच चर्चेत राहिलं. कारण कोणताही बडेजाव न करता कृतिका-गौरवने मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित घराच्या टेरेसवर लग्न केलं. कृतिका-गौरवने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वांनीच कौतुक केलं.7 / 7कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांचा विवाहसोहळा नोंदणीकृत पद्धतीने पार पडला होता. कृतिकाचा नवरा गौरव कपूर हा एक टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि क्रिके़ट कॉमेंटेटर आहे. दोघांच्या लग्नात बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीही उपस्थित होते.