लाल लेहेंगा, पांढरी शेरवानी; अदिती राव हैदरी अन् सिद्धार्थने पुन्हा केलं लग्न, शेअर केले रॉयल Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 14:39 IST
1 / 8अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि सिद्धार्थ (Siddharth) हे मोस्ट फेवरेट कपल आहे. सप्टेंबर महिन्यातच त्यांनी लग्नगाठ बांधली होती. तेलंगणामधील ४०० वर्ष जुन्या मंदिरात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता.2 / 8आता दोघांनी पुन्हा सातफेरे घेतले आहेत. राजस्थानमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. या लग्नातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 3 / 8अदितीच्या लाल रंगाच्या वेडिंग आऊटफिटवरुन कोणाचीही नजर हटत नाहीए. हिंदू पद्धतीने त्यांनी लग्न केले. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.4 / 8अदितीने लग्नासाठी खूप खास आऊटफिटची निवड केली आहे. लाल रंगाच्या सुंदर लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. यावर फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज आहे. 5 / 8अदितीने लग्नासाठी खूप खास आऊटफिटची निवड केली आहे. लाल रंगाच्या सुंदर लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. यावर फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज आहे. 6 / 8सिद्धार्थ पांढऱ्या शेरवानीत दिसत आहे. तर गळ्यात मोत्यांची लांब माळ घातली आहे. तसंच एका खांद्यावर उपरणं घेतलं आहे. 7 / 8राजस्थानमधील बिशनगढ येथे आलिला फोर्टमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. फोटोंमध्ये बॅकग्राऊंडला सुंदर नजारा दिसत आहे.दोघांच्या गळ्यात हार आहेत.8 / 8अदिती आणि सिद्धार्थच्या फोटोंना काही तासातच अनेक लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. 'कोणाची नजर लागू नये' असे चाहते म्हणत आहेत. तर काहींनी 'किती वेळा लग्न करणार' असं म्हणत त्यांची चेष्टाही केली आहे. सौजन्य- Aditi Rao Hydari Instagram