Join us

लग्नानंतर ६ वर्षांनी डिवोर्स, ४ वेळा मोडला साखरपुडा; खेळाडूलाही केलं डेट; कोण आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:49 IST

1 / 8
मनोरंजनविश्वात ब्रेकअप, घटस्फोट हे फारच कॉमन झालं आहे. कोणी अनेक वर्षांचा संसार मोडला आहे तर कोणी लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतरही वेगळे झाले आहेत.
2 / 8
अशीच एक अभिनेत्री जिचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं. सहा वर्षांचा संसार मोडला. चार वेळा साखरपुडा केला पण नातं लग्नापर्यंत गेलंच नाही.
3 / 8
ही अभिनेत्री आहे किम शर्मा (Kim Sharma). 'मोहोब्बते' सिनेमात ती झळकली होती. आज किम ४५ वर्षांची आहे आणि सिंगल आहे.
4 / 8
२०१० साली किमने केन्याचा बिझनेसमन अली पुंजानीसोबत लग्न केलं होतं. मात्र २०१६ साली त्यांचा घटस्फोट झाला.
5 / 8
किमने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, 'माझा एकदाच घटस्फोट झाला आहे. मी अजून दुसरं लग्न केलेलं नाही. हो, पण चार वेळा माझा साखरपुडा झाला आणि मोडला आहे. माझा आजही प्रेमावर विश्वास आहे.'
6 / 8
किमने अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट केलं आहे. त्यांच्या अफेअरच्या बातम्या कायम चर्चेत राहिल्या. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं.
7 / 8
किम आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांचंही अफेअर चर्चेत होतं. दोघ लिव्हइनमध्ये राहत होते आणि लग्नही करणार होते. मात्र हेही नातं टिकलं नाही आणि ते वेगळे झाले. याशिवाय युवराज सिंहसोबतही तिचं नाव जोडलं गेलं होतं.
8 / 8
किमने १० वर्ष इंडस्ट्रीत काम केलं. नंतर ती सिनेमापासून दूर झाली. आता किम शर्मा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते.
टॅग्स :किम शर्माबॉलिवूडरिलेशनशिपलग्नघटस्फोट