Join us

नुसरत भरुचाची तब्येत बिघडली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:44 IST

नुसरतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री नुसरत भरूचाची (Nushrratt Bharuccha) तब्येत अचानक बिघडली आहे. दिवाळीनंतर तिची तब्येत खालावली. नुकतंच तिने सोशल मीडियावर हेल्थ अपडेट दिलं. सर्दी, ताप, अंगदुखी आणि डोळ्यांच्या संसर्गामुळे तिला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीतही ती काम करत आहे. यामुळे चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.

नुसरत भरूचाने कारमध्ये बसून तिचा एक सेल्फी शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शन लिहित हेल्थ अपडेट दिलं आहे. ती लिहिते, 'पोस्ट दिवाळी स्टेटस: सर्दी, ताप, कफ, अंगदुखी आणि डोळ्यांचा संसर्ग. तरी कसंतरी स्वत:ला मीटिंगसाठी घेऊन जात आहे.'

काही दिवसांपूर्वीच नुसरतने केदारनाथ, बद्रीनाथचे दर्शन घेतले. तिने तिथले फोटोही शेअर केले होते. तिथून परतल्यानंतर तिने कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. मात्र यानंतर तिची तब्येत खालावली. नुसरत भरूचाच्या 'अकेली' सिनेमातील भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. आता तिच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. तसंच तिची तब्येत लवकर बरी व्हावी अशी चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.

टॅग्स :नुसरत भारूचाबॉलिवूडआरोग्यसोशल मीडिया