Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया, दीपिका नाही तर, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी घेतले कोट्यावधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 18:26 IST

ही अभिनेत्री  फक्त बॉलिवूडचं नाही तर साऊथमध्येही लोकप्रिय आहे.

अभिनेत्री सिनेमांसाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. केवळ सिनेमाच नाही, तर काही अभिनेत्री केवळ एक जाहिरातीसाठी कोट्यवधींचं मानधन घेतात.  आजकाल सेलिब्रिटी चित्रपटांपेक्षा जाहिरातींमधून जास्त पैसे कमावतात. यामध्ये दीपिका, करीना, कतरिना अशी अनेक नावे आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे, जिनं फक्त 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी तब्बल 5 कोटी मानधन घेतलं आहे. आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने इतक्या कालावधीसाठी एवढी मोठी रक्कम आकारलेली नाही.

ही अभिनेत्री  फक्त बॉलिवूडचं नाही तर साऊथमध्येही लोकप्रिय आहे. तिला साऊथची लेडी सुपरस्टार संबोधलं जातं. या अभिनेत्रीने नुकताच शाहरुख खानसोबत 'जवान' हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. ही दुसरी तिसरी कोणी नाही तर लाखो हृदयाची धडकन सुपरस्टार नयनतारा आहे. नयनतारा ही साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराने टाटा स्कायसोबत एक डील साइन केली होती. तिनं 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेतले होते. ही जाहिरात दोन दिवसात शूट करण्यात आली आणि ती तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाली.

\  

नयनतारा लक्झरी लाइफ जगते. GQ  मधील एका रिपोर्टनुसार, अभिनेत्रीकडे महागड्या कार आणि खाजगी जेट देखील आहे. तिच्या कलेक्शनमध्ये एक आलिशान मर्सिडीज मेबॅचचा समावेश आहे, जी तिला पतीने अलीकडेच  तिच्या 39 व्या वाढदिवशी भेट दिली होती. यासोबतच नयनतारा एका प्रोडक्शन हाऊसची सह-मालक देखील आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे नाव 'राउडी' आहे. तसेच  नयनताराने तिचा 9 SKIN नावाचा स्किन केअर ब्रँड लॉन्च केला आहे. अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री 183 कोटी एवढ्या संपत्तीची मालक आहे.  

टॅग्स :नयनतारासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाTollywood