Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:58 IST

बॉलिवूडमधील अभिनेत्याने निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच भाजपा जिंकेल असं भाकीत केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत (pm narendra modi)

उद्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कॉंग्रेस, भाजपा या देशांच्या प्रमुख पक्षांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. कोण किती जागा जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय देशातील सत्तेच्या सिंहासनावर कोणता पक्ष विराजमान होणार, हा सुद्धा कुतुहलाचा विषय आहे. अशातच बॉलिवूडमधील अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने भाजपा जिंकणार हे निवडणुकीआधीच भाकीत केलंय.

KRK ने निकालाआधीच केलंं भाजपाचं अभिनंदन

कमाल आर खानने ट्विट केलंय की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत कायम चमकत राहील. भाजपा ३०० ते ३५० जागा जिंकेल. कोणीही काहीही करु शकत नाही." असं भाकीत कमाल आर खानने केलंय. कमाल आर खानने निकालाआधीच हे ट्विट केल्याने तो चांगलाच ट्रोल झालाय.

KRK ने ट्रोलर्सला दिलं उत्तर

पीएम मोदींचे अभिनंदन केल्यानंतर केआरकेला सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले. यानंतर त्याने ट्रोलर्सला उत्तर दिले. केआरकेने आणखी एक ट्विट करुन लिहिलंय की, "जेव्हापासून मी भाजप जिंकल्याचे ट्विट केले आहे, तेव्हापासून बरेच लोक मला शिव्या देत आहेत. माझ्या ट्विटमुळे लोक दुखावले आहेत त्यामुळे मी समजू शकतो. पण सत्य हे आहे की,  त्यांना या प्रसंगाला काही दिवसांनी सामोरे जावे लागणारच आहे. कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील."

 

टॅग्स :नरेंद्र मोदीअमित शाहभाजपालोकसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणूक २०२४ निकाल