Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस", प्रसाद ओकने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंचा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:51 IST

प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांच्या मनाच्या मोठेपणाचा एक किस्सा सांगितला.

अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आगामी 'धर्मवीर 2' मध्ये दिसणार आहे. धर्मवीर सिनेमा सुपरहिट झाला होता. आता याच्या सीक्वेलची चर्चा आहे. प्रसाद ओक धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेत आहे तर क्षितिज दाते एकनाथ शिंदेंच्या  भूमिकेत आहे. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्वत: सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. दरम्यान नुकतंच प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांच्या मनाच्या मोठेपणाचा एक किस्सा सांगितला.

प्रसाद ओक काही दिवसांपूर्वीच नवीन घरात शिफ्ट झाला. त्याने आपल्या मेहनतीने मुंबईत घर घेतलं. या घराच्या वास्तूशांतीसाठी त्याने मुख्यमंत्री शिंदेंनाही आमंत्रण दिलं होतं. 'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत याचाच किस्सा सांगताना प्रसाद म्हणाला, "मी घराच्या वास्तुशांतीसाठी उद्या मुख्यमंत्री येतील का असं त्यांच्या पीएला विचारलं. तर पीए म्हणाले हो नक्की येतील. वास्तूशांतीच्या दिवशी रात्री ९ वाजता ते रायगडमध्ये सभा घेत होते. माझा मुलगा लाईव्ह सभा बघत होता. तो म्हणाला आता काय ते येणं शक्य नाही.  साडेनऊ वाजलेत रात्रीचे आता ते कसे येतील. १० वाजता सभा संपली आणि ११ वाजता ते माझ्या घरी टच झाले."

तो पुढे म्हणाला, "इतकंच नाही तर त्यांचा मोठेपणा काय आहे बघा. घरी आल्यानंतर  पहिल्यांदा त्यांनी मला विचारलं,'प्रसादजी किती लोकांचं जेवण आहे?' मी म्हटलं, 'म्हणजे?' तर ते म्हणाले, 'माझा स्टाफ १८ जणांचा आहे. मी म्हणलं साहेब २५-३० लोकांसाठी जेवण आहे.'  मग ते म्हणाले 'हा मग ठीके'. त्यांनी स्वत:साठी नाही विचारलं तर त्यांच्याबरोबरचे ड्रायव्हर, सुरक्षारक्षक, स्टाफ यांच्या जेवणासाठी माझ्याकडे चौकशी केली. याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस."

'धर्मवीर 2' २७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून आता सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. प्रसाद ओक, क्षितीज दाते जोरदार प्रमोशन करत आहेत. 

टॅग्स :प्रसाद ओक एकनाथ शिंदेमुख्यमंत्रीमहाराष्ट्रमराठी अभिनेतामराठी चित्रपट