Join us

"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:43 IST

प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी तिने मीडियासोबत साधलेला संवाद चांगलाच व्हायरल झाला आहे

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिका, वेबसीरिजमध्ये अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता अनेक मराठी सिनेमांच्या प्रीमिअरला हजेरी लावून कलाकारांना प्रोत्साहन द्यायला उपस्थित असते. प्राजक्ताच्या उपस्थितीने कलाकारांनाही आनंद होतो. अशातच एका आगामी कलाकृतीच्या प्रीमिअर सोहळ्याला प्राजक्ता उपस्थित होती. त्यावेळी प्राजक्ता साधं शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली होती. तेव्हा काय घडलं?

प्राजक्ता साधं शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली, अन्...

'बाई तुझ्यापायी' या वेबसीरिजच्या प्रीमिअर सोहळ्याला प्राजक्ताने हजेरी लावली होती. एरवी साडी किंवा ड्रेसमध्ये असलेली प्राजक्ता यावेळी मात्र एक साधं शर्ट परिधान करुन आली होती. प्राजक्ता फोटोसाठी पोज द्यायला उभी राहिली. तेव्हा ती हसून म्हणाली, ''मी अवतारात आलेले आहे''. उपस्थित मीडियाने प्राजक्ताच्या या लूकला सुद्धा चांगली पसंती दिली. अशाप्रकारे प्राजक्ताचा हटके अंदाज पाहायला मिळाला. प्राजक्ताने पुन्हा एकदा तिच्या साध्या तरीही आकर्षक फॅशनने सर्वांचं लक्ष वेधलं.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिची भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात प्राजक्ताने प्रमुख भूमिका साकारली याशिवाय तिने सिनेमाची निर्मिती केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताच्या नवीन सिनेमाची  तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. 'फुलवंती'नंतर प्राजक्ती तिच्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कोणती कलाकृती भेटीला आणणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Mali's simple shirt look goes viral on red carpet.

Web Summary : Prajakta Mali, known for her roles in Marathi entertainment, recently attended a premiere wearing a simple shirt. Her casual yet attractive fashion sense was well-received, with Mali playfully stating she was in 'avatar' mode. She is currently hosting 'Maharashtrachi Hasyajatra'.
टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनमराठी अभिनेतामराठी चित्रपट