अभिनेत्री किशोरी शहाणे या हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. किशोरी शहाणेंना आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलं आहे. किशोरी शहाणेंबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. किशोरी शहाणेंनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती सर्वांना सांगितली आहे. जाणून घ्या काय घडलंकिशोरींच्या गाडीचा अपघात कसा झाला?
किशोरी शहाणेंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांच्या गाडीचा साईड मिरर तुटलेला दिसतोय. किशोरी सांगतात की, ''इतरांचं जे नुकसान होतं त्याबद्दल जरा संवेदनशीलतेने बाळगा... एक मोठी कार माझ्या उजव्या बाजूने आली, माझ्या कारचा आरसा तोडला आणि सिग्नलवरून उजवीकडे वळून वेगाने निघून गेली. हे बघून खूप दुःख झालं..''
''आपण सगळेच आपल्या आयुष्यात व्यस्त आहोत, पण तुम्हाला उशीर होत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेदरकारपणे गाडी चालवून दुसऱ्याचं नुकसान करावं. आजकाल कोणाकडेच वेळ नसतो.. आता पुन्हा मेकॅनिककडे जा, ते दुरुस्त करून घ्या, यामुळे उगाच मानसिक ताण वाढला आहे. यात माझी काहीच चूक नव्हती!", अशा शब्दात किशोरी शहाणेंनी त्यांचा संताप व्यक्त केला.
Web Summary : Actress Kishori Shahane's car met with an accident. A large car hit her vehicle's side mirror and sped away at a signal. Shahane expressed her frustration, highlighting the insensitivity of drivers who cause damage and flee.
Web Summary : अभिनेत्री किशोरी शहाणे की कार का एक्सीडेंट हो गया। एक बड़ी कार ने उनकी गाड़ी के साइड मिरर को टक्कर मार दी और सिग्नल पर तेजी से भाग गई। शहाणे ने अपनी निराशा व्यक्त करते हुए उन ड्राइवरों की असंवेदनशीलता को उजागर किया जो नुकसान पहुंचाते हैं और भाग जाते हैं।