Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अनेक आयांचे अश्रू,प्रेमाने मारलेली मिठी…",'उत्तर' सिनेमाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अभिनय बेर्डे भारावला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:46 IST

'उत्तर' सिनेमाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अभिनय बेर्डे भारावला, म्हणाला-"कुठल्याही कलाकारासाठी..."

Abhinay Berde Post: क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित 'उत्तर' हा सिनेमा १२ डिसेंबरला प्रदर्शित झाला. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane), अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि हृता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मायलेकाच्या नात्याची उत्तम गुफंण असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.अनेक बिग बजेट सिनेमांच्या शर्यतीत 'उत्तर' सिनेमा आपलं स्थान टिकवून आहे. सिने-रसिक हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघण्यासाठी आपली पसंती दर्शवत आहेत.

सध्या सोशल मीडियासह सर्वत्र उत्तर सिनेमाचं कौतुक होतंय. अशातच उत्तर सिनेमाला भरभरून प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांसाठी अभिनेता अभिनय बेर्डेने खास पोस्ट लिहिली आहे. अभिनयने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहून त्यामध्ये म्हटलंय, "कुठल्याही कलाकारासाठी असा प्रसंग ५-७ वर्षातून एकदाच येतो, आणि जर आपण केलेली कलाकृती दर्जेदार असेल तर मराठी प्रेक्षक अगदी खंबीरपणे त्या मागे उभा राहतो, उत्तर च्या पोस्ट शो रिएक्शन्स भारावून टाकतात अनेक आयांचे अश्रू, अगदी प्रेमाने मारलेली मिठी, आणि आज मिळाली गालावर पापी, हे सगळ बघून जाणवतं की खरच “ह्याच साठी केला होता अट्टाहास”, सर्व माय बाप रसिक प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार, हा संपूर्ण आठवडा तुम्हाला भेटण्यासाठी मी जास्तीत जास्त थिएटर विझिट्स करणार आहे, हे प्रेम आणि हा आशीर्वाद असाच कायम राहू द्या." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. 

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  या चित्रपटात रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकला आहे. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा पाहायला मिळत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhinay Berde overwhelmed by audience response to 'Uttar,' expresses gratitude.

Web Summary : Abhinay Berde is deeply moved by the audience's reception of 'Uttar,' a film about a mother-son relationship starring Renuka Shahane and Hruta Durgule. He expressed gratitude for the overwhelming love and support.
टॅग्स :अभिनय बेर्डेरेणुका शहाणेमराठी चित्रपटसोशल मीडिया