Join us
Daily Top 2Weekly Top 5

"टॅलेंडेट, गुणी, संयमी..."; अभिनय बेर्डेसाठी मराठी अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:49 IST

लोकप्रिय मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर अभिनय बेर्डेसाठी एक कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे.

Abhinay Berde: प्रेमळ आई आणि आधुनिक युगातील मुलाची हृदयस्पर्शी कहाणी म्हणजे उत्तर सिनेमा. कथेला आधुनिक संदर्भ देत त्यात एआयची कल्पना  गुफण्यात आली आहे. मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, कवी क्षितिज पटवर्धन  या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतो आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डेची प्रमुख भूमिका आहे. उत्तर सिनेमातील अभिनयच्या कामाचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावरअभिनय बेर्डेसाठी एक कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

अभिनय बेर्डेने 'ती सध्या काय करते' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तो बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकला. सध्या अभिनय त्याच्या उत्तर या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. याचदरम्यान, अभिनय बेर्डेचा सहकलाकार अभिनेता अभिजीत केळकरने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे. या पोस्टमध्ये अभिजीतने लिहिलंय," selfmade सुपरस्टार बाबाचा, selfmade सुपरस्टार मुलगा... talented, focused, गुणी, संयमी, सगळ्यांशीच वागायचं बोलायचं भान असणारा, मेहनती, मदत करायला तत्पर, प्रेमळ... @kshitijpatwardhan ची पोस्ट वाचली आणि लोक (आणि ते ही आमच्या क्षेत्रातले) ह्या अशा गुणी मुलाबद्दल असं बोलायचे हे वाचून खरं तर आश्चर्य वाटलं आणि त्यांची कीवही आली."

पुढे त्याने म्हटलंय, "अलिकडेच अभिनय बरोबर आमच्या "आज्जीबाई जोरात" ह्या नाटकात काम करण्याचा योग आला, त्यातही फार छान काम करायचा तो, मी नाटकात त्याच्या बाबाचा रोल केला होता, मलाच इतकं भारी वाटत होतं.त्या दरम्यान मी त्याला खूप observe केलं on n off stage सुद्धा, त्याच्याकडून शिक्षण्यासारखं बरंच काही आहे."

अभिनयच्या सर्वोत्तम कामांपैकी हा एक रोल... 

"प्रिया बेर्डे ताई, तुला त्यासाठी सलाम. परवाच, "उत्तर" हा त्याचा सिनेमा पाहिला, अभिनयच्या सर्वोत्तम कामांपैकी हा एक रोल असेल, इतकं सहज सुंदर आणि समजून काम केलंय त्याने... मोठमोठे, जाणकार दिग्दर्शक ही त्याचं कौतुक करतायत.अभिनय, now theres no looking back... असेच उत्तमोत्तम चित्रपट तुला मिळत राहोत, असंच तुझं कौतुक होत राहो आणि तुझ्या आई बाबांना असाच तुझा कायम अभिमान वाटत राहो... तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद...". अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actor praises Abhinay Berde's talent, humility after 'Uttar' film.

Web Summary : Abhinay Berde's performance in 'Uttar' is lauded. Co-star Abhijeet Kelkar praised his talent, humility, and dedication, noting his father's legacy and his own hard work. Kelkar admires Berde's behavior and acting skills.
टॅग्स :अभिनय बेर्डेरेणुका शहाणेमराठी चित्रपटसोशल मीडिया