Join us  

आरंभ है अंत का...! 'लागिरं झालं जी'फेम आज्याचा रॉकिंग स्वॅग पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 7:28 PM

Nitish Chavan: त्याने हॅलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा अॅटिट्यूड पाहून नेटकरी दंग झाले आहेत.

'लागिरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे नितिश चव्हाण (Nitish Chavan). या मालिकेत अजिंक्य ही भूमिका साकारुन त्याने तुफान लोकप्रियता मिळवली. सध्या नितिश त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टमुळे चर्चेत येत आहे. यामध्येच त्याचा एक नवा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कलाविश्वाप्रमाणेच नितिश सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काही ना काही नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. यावेळी त्याने हॅलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा अॅटिट्यूड पाहून नेटकरी दंग झाले आहेत.

दरम्यान, आरंभ है अंत का...असं कॅप्शन देत नितिशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा कमालीचा स्वॅग पाहायला मिळत आहे. अलिकडेच नितिशची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'मजनू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.  तसंच तो काही म्युझिक अल्बममध्येही झळकला आहे.

टॅग्स :नितीश चव्हाणसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा