स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिका चांगलीच चर्चेत आहे. गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव या दोघांची मालिकेत प्रमुख भूमिका आहे. याच मालिकेतील एक अभिनेत्री आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. 'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेत विद्याच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री साक्षी महाजन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. साक्षीचा होणारा नवराही अभिनेता आहे. जाणून घ्या.साक्षीचा होणारा नवरा आहे तरी कोण?
साक्षी महाजन मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. साक्षी अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अथर्व कर्वे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अथर्वने 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्य़े काम केलं आहे. याशिवाय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अथर्वने केलेली भूमिका चांगलीच गाजली. अथर्व आणि साक्षी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
या महिन्यात बांधणार लग्नगाठ
राजश्री मराठीने दिलेल्या रिपोर्टनुसार अथर्व आणि साक्षी फेब्रुवारी २०२६ मध्ये एकमेकांसोबत लग्न करणार आहेत. अथर्व आणि साक्षीच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. दोघांच्या लग्नाची ही बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या दोघेही विविध प्रोजेक्टमध्ये अभिनय करत असून चाहत्यांचं मन जिंकत आहे.
Web Summary : Sakshi Mahajan, known from 'Kon Hotis Tu Kay Zalis Tu,' is marrying actor Atharva Karve. Atharva is known for roles in 'Balagandharva' and 'Dr. Babasaheb Ambedkar'. The couple is reportedly marrying in February 2026.
Web Summary : 'कौन होतीस तू काय झालीस तू' से मशहूर साक्षी महाजन अभिनेता अथर्व कर्वे से शादी कर रही हैं। अथर्व 'बालगंधर्व' और 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' में भूमिकाओं के लिए जाने जाते हैं। खबरों के अनुसार, जोड़ी फरवरी 2026 में शादी करेगी।