Join us

'छावा'च्या यशानंतर कतरिना कैफ पोहोचली महाकुंभमेळ्यात, सासूसोबत घेतलं साधूसंतांचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:01 IST

Katrina Kaif Visit Mahakumbh 2025: महाकुंभमधील कतरिनाचे फोटो समोर आले आहेत. 

Katrina Kaif At Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. जनसामान्यांपासून ते दिग्गज मंडळी महाकुंभ मेळ्यात सहभागी होताना दिसत आहेत. तसंच कलाकार मंडळीदेखील महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कतरिना कैफप्रयागराजमध्ये पोहोचली आहे. यावेळी कतरिनासोबत तिचा पती विकी कौशल नाही तर सासू होती. महाकुंभमधील कतरिनाचे फोटो समोर आले आहेत. 

कतरिनाचा पती विकी कौशलची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. त्याची मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' चित्रपटानं धुराळा उडवून दिलाय. 'छावा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी विकी कौशल हा महाकुंभात गेला होता. आता 'छावा'ला मिळालेल्या यशानंतर कतरिना आणि विकीची आई महाकुभांत पोहचल्या. समोर आलेल्या फोटोमध्ये कतरिना ही गुलाबी रंगाच्या पंजाबी सूटमध्ये अगदी सिंपल लूकमध्ये पाहायला मिळाली. त्यातही ती प्रचंड सुंदर दिसत होती. आपल्या सासूसोबत कतरिनानं साधूसंतांचं दर्शन घेतलं.

माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, "मी खूप भाग्यवान आहे की मी यावेळी इथे येऊ शकलो. मी खरोखर आनंदी आणि कृतज्ञ आहे. मी स्वामी चिदानंद सरस्वतींना भेटले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.  मला महाकुंभामधील ऊर्जा, सौंदर्य आणि प्रत्येक गोष्ट आवडते. मी संपूर्ण दिवस येथे घालवण्यासाठी उत्सुक आहे". 

 कतरिना काही दिवसांपूर्वीच सासूसोबत शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी गेली होती.  वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री कतरिना कैफ  बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे. 'टायगर ३' या सिनेमात ती शेवटची दिसली. सध्या कतरिना संसारात रमली आहे. कतरिना कैफ ही मिश्र धर्माच्या कुटुंबातील आहे. खरंतर तिचे वडील हे धर्माने मुस्लिम होते. अभिनेत्रीच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आहे, जे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी आहेत. म्हणूनच ती तिच्या वडिलांचे आडनाव कैफ वापरते. तर अभिनेत्रीची आई ही सुझान टर्केट ख्रिश्चन आहे. कतरिना लहान असताना तिचे आई आणि वडील वेगळे झाले होते. तर ती लग्न करुन एका पंजाबी हिंदू कुटुंबात गेली आहे. कतरिना सर्व धर्मांचा सन्मान करते. ती सर्व सण मोठ्या उत्साहनं साजरी करते. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलकुंभ मेळाप्रयागराजबॉलिवूड