Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 12:53 IST

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.

बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना ओळखलं जातं. आलिया आणि रणबीरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. दोघांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याची नेहमी चर्चा रंगलेली असते.  नुकतेच आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. आता मुलगी राहाचं आगमन झाल्यानं रणबीर-आलियाचं कुटूंब पूर्ण झालं. पण, तुम्हाला माहितेय रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर एका लोकप्रिय अभिनेत्रीला करिश्मा कपूरनं  पसंत केलं होतं. 

रणबीर आणि करिश्मा हे भाऊ-बहिण आहेत. आज जरी करिश्माचे आलियासोबत चांगले संबंध असले तरी एके काळी कपूर कुटुंबाची सून म्हणून तिनं एका दुसऱ्या अभिनेत्रीला पसंत केलं होतं. सोनम कपूर ही रणबीर कपूरची पत्नी व्हावी, अशी इच्छा करिश्मा कपूरची होती. याचा खुलासा खुद्द सोनमने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये केला होता. 

 करिश्मा कपूर आणि सोनम कपूर  'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी करणनं सोनमला प्रश्न विचारला होता की कधी तिनं कपूर कुटुंबाची सून होण्याचा विचार केला आहे का? तर त्यावर उत्तर देत सोनम म्हणाली, "मला वाटतं की अशी करिश्मा कपूरची इच्छा होती, पण आम्ही चांगले मित्रच आहोत'. रणबीर कपूर आणि सोनम कपूर सावरिया चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, दोघांनीही ते कधीच स्वीकारलं नाही. 

फक्त सोनम कपूरचं नाही तर आलियाशी लग्न होण्यापुर्वी रणबीरचं अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आलं होतं.  एक काळ असा होता की रणबीर त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असायचा. त्याने बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणला डेट केलं आहे. कतरिना कैफसोबत रणबीर कपूरचे नाते काही काळ टिकले, दोघेही लग्न करणार, असे चाहत्यांना वाटू लागले होते. पण नंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर त्याचे नाव दीपिका पदुकोणसोबत जोडलं गेलं. पण ते नातेही फार काळ टिकलं नाही. 

टॅग्स :रणबीर कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडसोनम कपूरकरिश्मा कपूरआलिया भटकतरिना कैफदीपिका पादुकोण