Join us
Daily Top 2Weekly Top 5

'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीला रंगावरुन केलं ट्रोल; इंडस्ट्रीत करावा लागला वर्णभेदाचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 08:01 IST

Ulka gupta: प्रचंड लोकप्रियता मिळवूनही तिच्या वाट्याला संघर्ष काही चुकला नाही. अनेकांनी तिला सावळ्या रंगावरुन ट्रोल केलं.

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली मालिका म्हणजे झांसी की रानी. या मालिकेत अभिनेत्री उल्का गुप्ता (ulka gupta) हिने झाशीच्या राणीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती केवळ ७ वर्षांती होती. या मालिकेच्या माध्यमातून उल्काला प्रचंड लोकप्रियता मिळाली. इतकंच नाही तर तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, प्रचंड लोकप्रियता मिळवूनही तिच्या वाट्याला संघर्ष काही चुकला नाही. उल्काला अनेकांनी तिच्या सावळ्या रंगावरुन ट्रोल केलं.

उल्काने छोट्या पडद्यावर 'रेशम डंख', 'सात फेरे..सलोनी का सफर' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं मात्र, तिला खरी लोकप्रियता मिळाली ती 'झासी की राणी' या मालिकेच्या माध्यमातून. परंतु, कलाविश्वात उल्काला अनेकांनी तिच्या रंगावरुन ट्रोल केलं. तिने 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने रंगावरुन तिची कशी खिल्ली उडवली गेली यावर भाष्य केलं. 

डार्क रंगामुळे अनेकांनी उल्काला हिणवलं. लोकांची सतत बोलणी ऐकावी लागली. इतकंच नाही तर, तुझा रंग पाहिलायेस का? असं म्हणत अनेकांनी तिला बाहेरचा रस्ताही दाखवला. उल्काने वयाच्या ७ व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली. तिचे वडील याच क्षेत्रातील असल्यामुळे उल्कानेही या क्षेत्रात नशीब आजमावावं असं त्यांना वाटत होतं.

दरम्यान, उल्काला तिच्या शरीरयष्टीवरुनही अनेकांनी ट्रोल केलं. उल्का बारीक असल्यामुळे, तू तर अगदीच लहान वाटते, असं म्हणत लोक तिला हसायचे. मात्र, मालिकांसोबत तिने बॉलिवूडसिनेमांमध्ये काम केलं. २०१८ मध्ये रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमात ती झळकली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररोहित शेट्टीसिनेमाबॉलिवूड