बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या सुप्रसिद्ध अभिनेत्री. जया बच्चन कायम मीडियासमोर रागावताना दिसतात. जया यांचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियाावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते. हे पाहताच जया बच्चन यांचा पारा चांगलाच वाढला. काय घडलं नेमकं?
जया बच्चन यांचा पापाराझींवर राग, म्हणाल्या...
झालं असं की, जया बच्चन एका इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. जेव्हा त्या कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या तेव्हा अनेक फोटोग्राफर्सने त्यांचे व्हिडीओ आणि फोटो काढण्यासाठी त्यांच्याभोवती घेराव घातला. पापाराझी गोंधळ घालत होते हे पाहून जया बच्चन काहीक्षण थांबल्या. त्या काही सेकंद पापाराझींकडे रागाने बघत होत्या. जया बच्चन यांचा पारा चढला. त्या म्हणाल्या - खूप झालं आता, बाजूला व्हा. त्यानंतर श्वेताने पुढे येऊन आईला शांत केलं आणि ती जया यांना घेऊन पुढे गेली. नाहीतर मोठा वाद झाला असता.
अशाप्रकारे जया बच्चन पुन्हा रागावताना दिसल्या. काही लोकांनी जया बच्चन यांच्या या स्वभावावर टीका केली. तर काहींनी मात्र समर्थन दिलं. सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचा मान राखावा, अशा शब्दात नेटकऱ्यांनी जया बच्चन यांना पाठिबा दिलाय. जया बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२३ मध्ये त्या रणवीर सिंग, आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसल्या.
Web Summary : Jaya Bachchan, known for her media outbursts, recently flared up at paparazzi during an event. Her daughter, Shweta Bachchan, stepped in to calm the situation, preventing a potential argument. Some support Jaya's privacy, while others criticize her behavior.
Web Summary : जया बच्चन एक कार्यक्रम में पैपराज़ी पर भड़क गईं। बेटी श्वेता ने बीच-बचाव कर मामले को शांत किया। कुछ लोगों ने जया की निजता का समर्थन किया, तो कुछ ने उनके व्यवहार की आलोचना की।