हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक क्वेंटिन टॅरेंटिनो (Quentin Tarantino) आणि त्यांच्या कुटुंबाचा इराणनेइस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या बातमीमुळे जगभरातील टॅरेंटिनोच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणातील सत्य समोर आले आहे. जाणून घ्या सविस्तर
कशी पसरली अफवा?
सोमवारी एका एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून असा दावा करण्यात आला होता की, इराणच्या मिसाईल हल्ल्यात टॅरेंटिनो, त्यांची पत्नी डॅनिएला पिक आणि त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. टॅरेंटिनो गेली अनेक वर्ष इस्त्रायलला वास्तव्यास होते. त्यामुळेच या हल्ल्यात टॅरेंटिनो मारले गेले अशी चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. मात्र या चर्चेत काही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.
सोशल मीडियावरील गोंधळ पाहून टॅरेंटिनो यांच्या जवळच्या सूत्रांनी आणि प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे की, "क्वेंटिन टॅरेंटिनो पूर्णपणे जिवंत आणि सुरक्षित आहेत. त्यांच्या कुटुंबाला कोणतीही इजा झालेली नाही. सर्वजण सुरक्षित स्थळी आहेत." टॅरेंटिनो हे गेल्या काही वर्षांपासून इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि लॉस एंजेलिस अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्यास असतात, त्यामुळेच त्यांच्याबद्दलच्या या अफवेवर अनेकांनी सहज विश्वास ठेवला होता.
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन काही सोशल मीडिया पेजने सेलिब्रिटींच्या नावाचा वापर करून अफवा पसरवल्या आहेत. केवळ टॅरेंटिनोच नाही, तर अमेरिकन कॉमेडियन जेरी सीनफेल्ड यांच्याबद्दलही अशाच प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. 'पल्प फिक्शन' आणि 'किल बिल' सारखे मास्टरपीस देणारे टॅरेंटिनो सुरक्षित असल्याच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने आता अशा अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Web Summary : Reports of Quentin Tarantino and his family's death in an Iranian airstrike on Israel were false. Tarantino is safe and unharmed, representatives confirm. A social media rumor sparked the misinformation.
Web Summary : क्वेंटिन टारनटिनो और उनके परिवार की ईरान के हवाई हमले में मौत की खबरें झूठी हैं। प्रतिनिधिओं ने पुष्टि की है टारनटिनो सुरक्षित हैं। सोशल मीडिया पर उड़ी अफवाह।