Join us

हृदयविकाराच्या झटक्याने लोकप्रिय अभिनेता ऋषभचं निधन, ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:20 IST

Rishabh Tondon Passes Away: प्रसिद्ध अभिनेता ऋषभ दिवाळीनिमित्त दिल्लीला कुटुंबासोबत गेला होता. परंतु तिथेच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे

Rishabh Tondon Death: ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झाल्यानंतर मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गायक आणि अभिनेता ऋषभ टंडनचं (Rishabh Tandon) आज बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्लीत निधन झालं. ऋषभ टंडन आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी मुंबईहून दिल्लीला गेला होता. त्यावेळी हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याने  त्याचं कुटुंब आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

ऋषभ टंडनच्या अकाली निधनामुळे त्याचे चाहते आणि कुटुंबीय शोक व्यक्त करत आहेत. या दु:खद घटनेनंतर, त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांना आणि प्रसार माध्यमांना त्यांच्या खाजगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.

ऋषभचं वैयक्तिक आयुष्य

ऋषभ टंडनने अभिनयासोबतच गायन क्षेत्रातही आपलं विशेष स्थान निर्माण केलं होतं. 'फकीर - लिव्हिंग लिमिटलेस' आणि 'रशना: द रे ऑफ लाइट' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं होतं. विशेषतः 'इश्क फकीराना' या गाण्यामुळे ऋषभला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळेच ऋषभला 'फकीर' हे टोपण नावही पडलं होतं. याशिवाय 'एक आस्तिक', 'शिव की ऊर्जाओं से ओतप्रोत' आणि 'चांद तू' यांसारख्या गाण्यांमुळेही ऋषभला प्रसिद्धी मिळाली होती.

ऋषभ टंडन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. अभिनेत्री सारा खानसोबतच्या त्याच्या कथित संबंधांची मीडियात चर्चा झाली होती. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, साराने कुंकू लावलेला एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामुळे त्यांच्या लग्नाची अटकळ बांधली गेली होती. मात्र ही अफवा असल्याचं साराने सांगितलं.

ऋषभ टंडनने रशियन वंशाची ओलेस्या नेडोबेगोवा (Olesya Nedobegova) हिच्याशी विवाह केला होता. ओलेस्या उझबेकिस्तानमध्ये त्याच्या एका डिजिटल सीरिजची निर्माती होती, तिथेच त्यांची भेट झाली. एक उत्तम गायक आणि अभिनेता म्हणून ऋषभ टंडनने मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण केली होती. त्याच्या निधनाने संगीत आणि अभिनय क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Popular actor Rishabh Tandon passes away due to heart attack.

Web Summary : Actor and singer Rishabh Tandon died of a heart attack in Delhi. He was there to celebrate Diwali with family. Known for 'Ishq Fakirana,' his sudden death has shocked fans. He was previously linked to Sara Khan and married Olesya Nedobegova.
टॅग्स :मृत्यूबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारदिल्लीदिवाळी २०२५