Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलला 'या' प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 18:29 IST

नुकतेच विकी कौशलने प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

विकी कौशलबॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही रॉकस्टार मानला जातोविकी त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दिसण्यानेही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. सध्या तो बहुचर्चित 'स‌ॅम बहादूर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

विकी कौशलला ज्या प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करायचं आहे. तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून गौतम गंभीर आहे. नुकतेच विकीला कोणत्या क्रिकेटरचा बायोपिक करायला आवडेल? ्असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, 'लोक मला रिव्ह्यूमध्ये सांगतात मी तू गंभीर भूमिकांमध्ये चांगला दिसतोस'. यावेळी गौतम गंभीर विकीच्या शेजारी बसला होता. विकीच्या या विधानाला उत्तर देताना गंभीर म्हणाला की, 'तू घातलेले कपडे खूप चांगले आहेत. कारण माझे आयुष्य ब्लॅक अ‌ॅण्ड व्हाईट आहे. यावर विकी म्हणाला, 'हो, आतापासूनच तयारी सुरू केली आहे'. यावेळी विकी  लांब दाढी आणि काळ्या टी-शर्टमध्ये पाहायला मिळाला.

 

विकी कौशलचा सॅम बहादुर चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. १९७१ साली भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मोठी कामगिरी केलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. सॅम बहादुर हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे.  अभिनेत्री सान्या मल्होत्रा मानेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री फातिमा सना शेख माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं स्क्रिप्टींग गुलजार, भवनी अय्यर आणि शांतनु श्रीवास्वत यांनी केलं आहे.

टॅग्स :विकी कौशलगौतम गंभीरसिनेमाबॉलिवूड