तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) हे बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेतलं कपल. तमन्ना सध्या तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालत आहे. तर विजय वर्मासोबतच्या अफेअरमुळे ती लक्ष वेधून घेत आहे. तमन्ना आणि विजय अनेकदा इव्हेंट्, अवॉर्ड्स, पार्टी, मूव्ही डेटसाठी एकत्र दिसतात. त्यांनी मीडियापासून रिलेशन लपवलेलं नाही. नुकतंच पापाराझींनी दोघांना लग्नावरुन चिडवलं. तेव्हा तमन्नाची रिअॅक्शन काय होती बघा.
तमन्ना आणि विजय वर्मा काल एका बर्थडे पार्टीसाठी एकत्र पोहोचले. त्यांनी एकत्रच माध्यमांना पोजही दिली. तमन्नाने यावेळी प्रिंटेड ओव्हरकोट ड्रेस आणि पँट घातली होती. तर विजय कॅज्युअल आऊटफिटमध्ये होता. दोघंही हसतच हातात हात घालून पापाराझींसमोर आले. तेव्हा एक कॅमेरामन म्हणाला, 'शादी मुबारक'. हे ऐकून आधी तर दोघांना हसू आलं. आणि तमन्ना म्हणाली, 'Whatt?'
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माने 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम केलं. या सिनेमात त्यांचे इंटिमेट सीन्सही होते. याच सिनेमानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. अनेकदा तमन्नासोबतच्या नात्यामुळे विजयला ट्रोल केलं गेलं. यावर आपण काहीच करु शकत नाही असं तो म्हणाला होता. तर तमन्नाने विजयला तिची 'हॅपी प्लेस' असं संबोधलं होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं दिसून येतं.