Join us
Daily Top 2Weekly Top 5

5 ब्रेकअप अन् मोडलेला संसार; वयाच्या 75 व्या वर्षी एकाकी जीवन जगते ही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 15:37 IST

Simi garewal: तिचं नाव राज कपूर, मनमोहन देसाई, मन्सूर अली खान यांसारख्या दिग्गजांसोबत जोडलं गेलं होतं.

कलाविश्वात सेलिब्रिटींचे ब्रेकअप, अफेअर या गोष्टी काही नवीन नाहीत. आजवर अनेक कलाकारांचे प्रेम प्रकरण कलाविश्वात गाजले आहेत. यात सध्या अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.  सिमी ग्रेवाल हे नाव सध्याच्या घडीला कोणालाही नवीन नाही. बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी सिमी ग्रेवाल (simi garewal) हिचं आयुष्य अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलं. तब्बल ५ वेळा प्रेमात पडलेली ही अभिनेत्री उतार वयात एकाकी जीवन जगत आहे. त्यामुळेच तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं याची थोडक्यात माहिती घेऊयात.

१९४७ साली पंजाबमधील जालंधर येथे लहानाची मोठी झालेली अभिनेत्री म्हणजे सिमी ग्रेवाल. लष्करी पार्श्वभूमीत सिमी लहानाची मोठी झाली. सिमीचे वडील आणि आजोबा दोघंही सैन्यात होते.सिमी लहान असल्यापासून तिला सिनेमाचं वेड होतं. त्यामुळे लंडनमध्ये शिक्षण घेत असताना तिने पुन्हा देश गाठला. इथे आल्यानंतर टार्झन गोज टू इंडिया या सिनेमातून तिला पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात तिने केलेलं काम पाहून अनेक हिंदी निर्मात्यांनी तिला कामाची ऑफर दिली आणि तिचा बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला.

सिमीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवल्यानंतर अल्पावधीत ती लोकप्रिय झाली. त्यामुळे तिच्या अभिनयाची कायम प्रशंसा होत होती. परंतु, यासोबतच तिचे अफेअर्सदेखील चर्चेत आले. सिमीचं नाव राज कपूर, मनमोहन देसाई, मन्सूर अली खान,सलमान तासीर आणि रतन टाटा यांसारख्या दिग्गजांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, तिचं नातं कोणासोबतही फार काळ टिकलं नाही. तसंच काही मुलाखतींमध्ये रतन टाटा, मनमोहन देसाई यांच्यासोबत फक्त मैत्री होती असंही त्यांनी सांगितलं होतं.

मन्सूर अली खान यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिमीने दिल्लीच्या चुन्नामल घराण्यातील रवी मोहन यांच्याशी लग्न केलं. मात्र, लग्नाच्या तीन वर्षांमध्येच ते वेगळे राहू लागले. त्यानंतर १० वर्षांनी त्यांनी कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेतला. 'रवी मोहन चांगले व्यक्ती होते,आम्ही एकमेकांशी प्रामाणिक होतो,पण कदाचित देवाने आम्हाला एकमेकांसाठी बनवलं नव्हतं,'असं सिमीने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, जवळपास ५ व्यक्तींसोबत नाव जोडल्यानंतर आणि एकदा संसार मोडल्यानंतर आज सिमी ग्रेवाल एकाकी जीवन जगत आहेत. त्या ७५ वर्षांच्या असून त्यांच्याकडे पैसे, प्रसिद्धी सारं काही आहे. मात्र, त्यांना आयुष्यभर साथ देणारा जोडीदार नाही. सिमीने 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम आहे. तसंच ‘रेंदेव्होज विथ सिमी ग्रेवाल’ या टॉकशोमधून तिने खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवली.

टॅग्स :सिमी गरेवालरतन टाटासेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमाबॉलिवूड