Join us
Daily Top 2Weekly Top 5

अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:28 IST

रिचाने जुलै महिन्यातच बाळाला जन्म दिला.

अलीकडेच अभिनेत्री दीपिका पदुकोणने लेकीचं नाव जाहीर केलं. दुआ असं नाव ठेवण्यात आलं. यावरुन काहींनी सोशल मीडियावर टीकाही केली. आता अभिनेत्री रिचा चड्डानेही (Richa Chadha) तिच्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. रिचाने जुलै महिन्यातच बाळाला जन्म दिला. यानंतर चार महिन्यांनी तिच्या लेकीचं नाव समोर आलं आहे. अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चड्डाच्या गोंडस मुलीची झलक पाहिलीत का?

अली फजल आणि रिचा चड्डा यांच्या लेकीचं नाव 'जुनैरा इदा फजल' असं ठेवण्यात आलं आहे. जुनैरा हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ होतो गाइडिंग लाईट' म्हणजेच रस्ता दाखवणारा प्रकाश. तर इंग्रजीत याचा अर्थ फ्लॉवर ऑफ पॅराडाईज असाही होतो.

१६ जुलै २०२४ रोजी रिचाने लेकीला जन्म दिला. तर त्याआधी फेब्रुवारी महिन्यात तिने प्रेग्नंसीची घोषणा केली होती. जावेद अख्तर यांच्यासोबत रिचा आणि अलीचे कौटुंबिक संबंध आहेत. जावेद अख्तर यांना रिचाच्या मुलीचं नाव ज्वाला असं ठेवायचं होतं मात्र अखेर जुनैरा इदा हे नाव निश्चित करण्यात आलं.  

टॅग्स :रिचा चड्डाअली फजलपरिवारबॉलिवूड